वॉशिंग्टन: सध्या सगळीकडे व्हॅलेंटाइन डेची चर्चा आहे. जोडीदाराला काय गिफ्ट द्यायचे, किती खर्च करायचा यावर अनेकांच्या चर्चा, विचार सुरू आहेत. मात्र, एकाने निमित्त आपल्या प्रेयसीला एक आलिशान घर दिले आहे. या गिफ्टची किंमत आहे तब्बल १२०० कोटी रुपये. जगातील सर्वात श्रीमंत आणि अॅमेझॉनचा संस्थापक सीईओ जेफ बेझॉस यांनी हे महागडे गिफ्ट खरेदी केले आहे.

एका वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार, जेफ बेझॉस यांची प्रेयसी लॉरेन सांचेज मागील काही महिन्यापासून नव्या घराच्या शोधात होती. त्यानंतर अखेर लॉरेनला हे घर पंसतीस पडले. जेफ यांनी जानेवारीच्या अखेरच्या आठवड्यात हे घर खरेदी केले. जेफ यांनी हे घर माध्यम व्यावसायिक डेविड गेफेन यांच्याकडून खरेदी केले आहे. लॉस एंजलिसमधील हा आतापर्यंतचा सर्वात महागडा व्यवहार असल्याची चर्चा आहे. या आलिशान घराचे नाव ‘वॉर्नर इस्टेट’ आहे. या घराची निर्मिती ‘वॉर्नर ब्रदर्स’चे माजी अध्यक्ष जॅक वॉर्नर यांनी १९३० मध्ये केली होती.

वाचा:

वाचा:

याआधी २०१९ मध्ये लाशन मर्डोकने बेल-एअर इस्टेट खरेदी करण्यासाठी जवळपास १५ कोटी डॉलर खर्च केले होते. अॅमेझॉनचे संस्थापक-सीईओ जेफ बेजोस यांची संपत्ती १३ फेब्रुवारी रोजी १३१.३ अब्ज डॉलर इतकी होती. सध्या जेफ हे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here