नवी दिल्लीः करोनाच्या दुसऱ्या लाटेत गेल्या काही दिवसांपासून रोज ३ लाखांवर नवीन रुग्ण आढळून येत आहेत. रुग्णसंख्या वाढल्याने राज्यांमध्ये ऑक्सिजनचा तुटवडा ( ) आहे. हा तुटवडा दूर करण्याचे प्रयत्न सरकारकडून केले जात आहेत. भारत सरकार अनेक देशांकडून सामग्री मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. या कामात हवाई दलाची मोठी भूमिका आहे. हवाईची विमानं ऑक्सिजन टँकर्स आणि करोनासंबधी आवश्यक साधन-सामग्री आणण्यासाठी युद्ध पातळीवर कार्यरत आहेत.

हवाई दलाची मालवाहू विमानं आणि हेलिकॉप्टर्सनी आतापर्यंत ७३२ उड्डाणं केली आहेत. यादरम्यान त्यांनी देश आणि विदेशातून ४९८ ऑक्सिजनच टँकर पोहोचले आहेत.

देशात आतापर्यंत ४०३ कंटेनर पोहोचवले

हवाई दलाच्या या मेगा ऑपरेशनमध्ये ४२ वाहतूक विमानं तैनात करण्यात आली आहेत. यात सहा C-17, सहा Ilyushin-76,तीस मीडियम लिफ्ट C-130Js आणि AN-32 या विमानांचा समावेश आहे. हवाई दलाच्या पायलट्सनी आतापर्यंत देशात ४०३ ऑक्सिजन टँकर्स पोहोचवले आहेत. यासाठी ७३४ उड्डाणं ९३९ तासांत केली आहेत. त्यांनी 6856 मेट्रीक टन ऑक्सिजनसोबत १६३ मेट्रीक टन उपकरणं पोहोचवली, अशी माहिती हवाई दलाच्या प्रवक्त्याने दिली.

९ देशांसाठी उड्डाणं

हवाई दलाच्या विमानांनी जर्मनी, इंडोनेशिया, ऑस्ट्रेलिया, ब्रिटेन आणि संगापूरसह ९ हून अधिक देशांत ऑक्सिजन कंटेनर आणि इतर मदत सामग्री आणण्यासाठी उड्डाणं केली आहेत. आंतरराष्ट्रीय उड्डाणं करत हवाई दलाच्या विमानांनी ९५ कंटेनर आणले आहेत. यासाठी ४८० तासांचे उड्डाण केले आहे, असं हवाई दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं.

LAC वरही ऑपरेशन सुरू

हवाई दलाने चीन सीमेवर प्रत्यक्ष ताबा रेषेवरील आपली मोहीमही थांबवलेली नाही. गेल्या वर्षापासून भारत-चीन सीमेवर तणाव आहे. या भागांमध्ये आता उन्हाळ्यासाठी जवानांची तैनाती सुरू झाली आहे. याचा अर्थ सीमेवर आघाडीच्या चौक्यांवर दोन्ही बाजूंनी मोठ्या संख्येत सैनिक तैनात असतील.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here