नवी दिल्लीः भारतात पीकवर म्हणजे सर्वोच्च बिंदूवर ( ) आहे, असं केम्ब्रिज जज बिजनेस स्कूल अँड नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इकॉनॉमिक अँड सोशल रिसर्चने म्हटलं आहे. एका नव्या ट्रॅकर डेटाद्वारे केलेल्या रिसर्चच्या आधारावर या संस्थेने हा दावा केला आहे.

भारतात करोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ दिसून येत आहे. रुग्णांची संख्या पीकवर आहे, असं या रिपोर्टमध्ये असल्याचं ब्लुमबर्गने म्हटलं आहे. पण काही राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील आकड्यात मोठीत फरक दिसून येत आहे. पुढील दोन आठवड्यात आसाम, हिमाचल प्रदेश, तामिळनाडू आणि त्रिपुरामध्ये करोनाच्या नवीन रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढण्याची शक्यता या रिपोर्टमध्ये व्यक्त करण्यात आली आहे. भारतात करोनाच्या सर्वाधिक नवीन रुग्णांची संख्या ७ मे रोजी नोंदवली गेली होती. त्या दिवशी ४ लाख १४ हजारांवर देशात रुग्ण आढळून आले होते.

देशातील ७७ टक्के अॅक्टिव्ह रुग्ण ११ राज्यांमध्ये

देशात सध्या करोनाचे ३६ लाख ९९ हजारांव अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. हे रुग्ण देशातील ११ राज्यांमध्ये आहेत. मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल, तामिळनाडू, राजस्थान, केरळ, कर्नाटक, छत्तीसगड, गुजरात, आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्र या ११ राज्यांमध्ये हे रुग्ण आहेत.

करोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे देशातील जवळपास १८ राज्यांमध्ये संपूर्ण लॉकडाउनसारखी स्थिती आहे किंवा निर्बंध आहेत. यात महाराष्ट्र, हिमाचल प्रदेष, हरयाणा, दिल्ली, राजस्थान, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, छत्तीसगड, ओडिशा, मध्य प्रदेश, कर्नाटक, करेळ, तामिळनाडू, मिझोराम, गोवा, तेलंगण आणि पुदुच्चेरी यांचा समावेश आहे.

सुप्रीम कोर्टाचे न्यामूर्ती डी. वाय. चंद्रचूड करोना बाधित

दरम्यान, सुप्रीम कोर्टाचे न्यायमूर्ती डी. वाय. चंद्रचूड हे बुधवारी करोना पॉझिटिव्ह आढळून आले. त्यांच्या कार्यालयातील एक कर्मचारी हा पॉझिटिव्ह आढळून आला होता. चंद्रचूड हे सतत अनेक प्रकरणांची सुनावणी घेत आहेत. यात निवडणुका, कुंभमेळा, ऑक्सिजन पुरवठा सारख्या प्रकरणांचा समावेश आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here