वाचा:
देशातील अनेक शहरांच्या तुलनेत कोल्हापूर शहर आणि जिल्ह्यात करोना बाधितांच्या मृत्यूचे प्रमाण अधिक आहे. हे वाढते प्रमाण रोखण्यासाठी ग्रामविकास मंत्री यांनी टास्क फोर्सचा पाचारण केले आहे. त्यानुसार डॉ. सुभाष साळुंके यांच्या नेतृत्वाखाली समितीने बुधवारी कोल्हापूरला भेट दिली. त्यांनी आरोग्य यंत्रणा, प्रशासकीय अधिकारी यांच्याशी चर्चा करताना विविध रुग्णालयांनाही भेटी दिल्या. ही समिती आपला अहवाल पुणे विभागीय आयुक्त सौरभ राव यांना देणार आहे व त्यानुसार पुढील पावले उचलली जाणार आहेत.
वाचा:
येत्या पंधरा दिवसांत मृत्यूचा दर ३० ते ४० टक्के कमी कसा करता येईल याबाबत काही सूचना देण्यात येणार आहेत व सुधारणा सूचविण्यात येणार असल्याचे समितीने स्पष्ट केले आहे. यासाठी आवश्यक औषधे व सुविधाही देण्यात येणार आहेत. उपचार प्रणालीतील त्रुटींमुळे मृत्यूचा दर वाढल्याचा प्राथमिक निष्कर्ष या समितीने काढला आहे.
दरम्यान, कोल्हापूर जिल्ह्यात आज तब्बल दोन हजार २७४ नवीन करोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. आजपर्यंतचा हा दैनंदिन रुग्णसंख्येचा उच्चांक ठरला आहे. त्याचवेळी जिल्ह्यात आज ५८ जणांचा करोनाने मृत्यू झाला आहे.
वाचा:
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times