गडचिरोली: धानोरा तालुक्यातील सावरगाव मदत केंद्र अंतर्गत येणाऱ्या मोरचुल जंगल परिसरात नक्षलविरोधी अभियान राबवीत असताना पोलीसांमध्ये व नक्षल्यांमध्ये चकमक उडाली यात दोन नक्षलीना कंठस्नान घालण्यात पोलीस दलास यश आले आहे.

प्राप्त माहितीनुसार, सावरगाव पोलीस मदत केंद्र अंतर्गत येणाऱ्या मोरचूल जंगल परिसरात असल्याची माहिती गडचिरोली पोलीस दलास प्राप्त झाली. मिळालेल्या माहितीच्या आधारे आज सकाळच्या सुमारास सदर जंगल परिसरात नक्षलविरोधी अभियान राबविण्यात आले असता दबा धरून बसलेल्या नक्षल्यांनी पोलिसांच्या दिशेने बेछूट गोळीबार केला. यावेळी पोलिसांनी सुद्धा प्रत्युत्तरदाखल नक्षल्यांच्या दिशेने गोळीबार केला.

जवळपास तासभर चकमक उडाली व पोलिसांचा वाढता दबाव पाहून नक्षल्यांनी जंगलाचा फायदा घेत पसार झाले. दरम्यान पोलीस जवानांनी सदर परिसरात शोधमोहीम राबविली असता दोन नक्षली ठार झाल्याचे निदर्शनास आले असून घटनास्थळी मोठ्या प्रमाणात रक्ताचा सडा आढळून आला. जखमी आणि मृतकांची संख्या जास्त असल्याची शक्यता वर्तवली जात असून अजूनही परिसरात पोलिसांकडून शोध मोहीम राबविली जात आहे आहे.

या अगोदर २८ एप्रिल रोजी एटापल्ली तालुक्यातील गट्टा पोलीस मदत केंद्र अंतर्गत येत असलेल्या जंगल परिसरात उडालेल्या पोलीस नक्षल चकमकित दोन नक्षली ठार झाले होते हे विशेष.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here