म. टा. प्रतिनिधी, नागपूर: करोना विषाणू प्रादुर्भावाच्या दुसऱ्या लाटेतून शहर सावण्याची शक्यता धुसर होत आहे. ज्यांना कोव्हिडची लागण होऊन गेलेली आहे, अशा रुग्णांमध्येही पोस्ट कोव्हिड या बुरशीजन्य संसर्गाचाही फास आवळत जातोय.
गेल्या २४ तासांत या बुरशीजन्य आजाराने २ जणांना जीव गमवावा लागलाय. तर आतापर्यंत ८ जणांना दृष्टी गमावल्याने कायमचे अंधत्व आले आहे.

म्युकरमायकोसिसमुळे दगावलेल्यांपैकी एक ६० वर्षीय व्यक्तीवर मेडिकलमध्ये उपचार सुरू होते. तर दुसऱ्याला मेयोत दाखल करण्यात आले होते.
अब्दुल रशीद (वय ६०) असे या म्युकोग्रस्त रुग्णाचा नाव आहे. करोना झाल्यानंतर ते बरे झाले. यानंतर अचानक ९ मे रोजी त्यांना मेडिकलमध्ये दाखल करण्यात आले. त्यावेळी ते व्हेंटिलेटवर होते. लगेच दोन दिवसांच्या उपचारानंतर त्यांचा काल रात्री मृत्यू झाला. २० एप्रिल रोजी अब्दुल रशीद यांना करोनाची लागण झाल्यानंतर खासगी रुग्णालयात उपचार झाले. करोनातून ते बरे झाले. मात्र त्यांचं डोकं दुखत होतं. उजव्या डोळ्यांजवळ सुज आली होती. त्यांना व्हेंटिलेटवरच असताना मेडिकलमध्ये आणले. दोन दिवसात त्यांचा मृत्यू झाला. याला येथील वरिष्ठ डॉक्टरांनी दुजोरा दिला आहे.

सध्याच्या स्थितीत मेडिकलमध्ये १० तर मेयोत ११ जण म्युको मायकोसिस वरील उपचारााठी भरती आहेत. या रुग्णांमध्ये हृदय, फुफ्फुसं, मूत्रपिंडं, मेंदू अशा महत्त्वाच्या अवयवांच्या कार्याशी निगडीत अनेक शारीरिक व्याधी उद्भवत असल्याचं लक्षात आलं आहे. मेयोत ११ बुरशीजन्य आजाराच्या रुग्णांपैकी ६ पुरुष तर ५ महिला आहेत. यातील चार जणांवर शस्त्रक्रियाही झाली आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here