पुणे : पुण्यात आगीची एक मोठी बातमी समोर येत आहे. सिरम कंपनीसमोर आकाशवाणीचा मोठी जागा आहे, त्याठिकाणी भीषण आग लागल्याची माहिती देण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सोलापूर रोड इथल्या आकाशवाणीच्या मोकळ्या जागेमध्ये गवताला भीषण आग लागली आहे.

अग्निशामक दलाची एक गाडी आग विजवण्यासाठी दाखल झाली असून सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. वारा मोठ्या प्रमाणात असल्याने आगीचा झळा कार्यालयापर्यंत येऊन पोहोचल्या आहेत. तर गाडीतील पाणी संपल्यामुळे आग विझवण्याचं काम काही काळ थांबलं असल्याची माहितीही देण्यात आली आहे.

अधिक माहितीनुसार, या आगीचा सिरम कंपनीला काहीही धोका नसल्याचं सांगण्यात येत आहे. हा 23 एकरचा प्लॉट आहे. जागा मोकळी असल्यामुळे इथे मोठ्या प्रमाणात गवत वाढलं आहे. याच गवताने पेट घेतला आणि हळूहळू संपूर्ण परिसरात आग लागली.

उन्हाच्या तडाख्याने आग आणखी पेटत असल्यामुळे घटनास्थळी आगीचा दुसरा बंबही बोलावण्यात आला आहे. अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचे शर्तीचे प्रयत्न सुरू असून पोलिसही घटनास्थळी दाखल झाले आहे.

मोकळ्या परिसरात ही आग नेमकी लागली याचा पोलीस शोध घेत असून परिसरात नागरिकांनाही सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं असल्याचं सांगण्यात येत आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here