मुंबई : राज्यात करोनाची साखळी तोडण्यासाठी लॉकडाऊन १ जूनपर्यंत वाढवण्यात आला आहे. आधीच सगळं काही बंद असल्यामुळे अर्थव्यवस्था ढासळली असताना आता पुन्हा लॉकडाऊन वाढल्यामुळे सर्वसामान्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. यावरून भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी सत्ताधारी पक्षावर घणाघाती टीका केली आहे.

“माझे कुटुंब, माझी जबाबदारी!”… सामान्यमाणसा, नोकरदारा, बलुतेदारा, नोकरदारा, कष्टकरी मजुरा, तूच आहेस तुझा रक्षणकर्ता. मायबाप राज्य सरकारने तुला नव्या लाटेत वाऱ्यावर सोडले आहे. तुझा EMI, तुझं घरखर्च, तुझं लाईटबिल तुच पहा..” अशा शब्दात केशव उपाध्ये यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर घणाघाती टीका केली आहे.

याआधी केशव उपाध्ये यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर ट्वीट करत टीका केली होती. मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या कुटुंबाची जबाबदारी घेतली आहे आणि शरद पवारांना बारमालकांची काळजी आहे. तू तुझ्या कुटुंबाची जबाबदारी घे. वसुली सरकारवर विसंबून राहण्यात अर्थ नाहीत वसुली सरकारमध्ये पोलिसांत वाजे तर लस द्यायला लाडका आहे, सामान्य माणसा तुच तुझा वाली असं म्हणत केशव उपाध्ये यांनी सरकावर निशाणा साधला आहे.

खंरतर, लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला असला तरी कोणत्याही नियमांमध्ये सवलती देण्यात आलेल्या नाहीत. इतकंच नाही तर एकीकडे पैसे येण्याचा मार्ग बंद आहे तर दुसरीकडे इंधनात वारंवार दर वाढ केली जात असून दैनंदिन जीवनातील अनेक वस्तू आणि किराणा महाग झाला आहे. यामुळे सर्वसामान्य जनतेवर मोठं संकट कोसळलं आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here