नागपूरः कालव्याला लागून झुडूपात छाव्यांना सोडून वाघिण शिकारीला गेली असावी. तिच्या अनुपस्थितीत बाहेर पडलेले दोन छावे कालवा ओलांडताना विहिरीत पडून दगावली असावीत, असा प्राथमिक अंदाज गुरुवारी मांडण्यात आला. घटनास्थळापासून काही अंतरावर मध्यरात्रीच्या सुमारास एक वाघिण कालव्याजवळील कॅमेरात ट्रॅप झाल्याने या अंदाजाला दुजोरा मिळत आहे.

भंडारा जिल्ह्यात बुधवारी एकाच दिवशी वाघाचे तिनं छावे आणि एक अस्वलाचा मृतदेह आढळला होता. घटनेची गंभीरता लक्षात घेता मुख्य वन संरक्षक कल्याण कुमार (वन्यजीव) तडकाफडकी गुरुवारी शहरात दाखल झाले. भंडारात पोचताच कुमार यांनी ज्या ठिकाणी काल वाघाचे दोन छावे पाण्यात बुडून मरण पावले होते, त्या घटनास्थळाची पाहणी केली.

टेकेपार उपसा सिंचन कालव्यालगत वन विभागाने लावलेल्या कॅमेरा ट्रॅपचे फुटेजही त्यांनी खंगाळले. त्या पैकी एका कॅमेरात मध्यरत्रीच्या सुमारास एक वाघिण झुडपाच्या दिशेने जाताना आढळून आली. हा घटनाक्रमही कॅमेरात कैद झाल्याने वाघिण शिकारीला गेली असावी आणि तिच्या अनुपस्थितीत हे छावे कालव्याजवळील विहिरीत पडले असावेत, असा प्राथमिक कयास मांडला जातोय.

सोबतच कल्याण कुमार यांनी पवनीत ज्या ठिकाणी तिसरा छावा आणि एक अस्वल मृतावस्थेत आढळले होते, त्याही ठिकाणची पाहणी केली. त्यांच्या सोबत विभागीय वन संरक्षक एस बी भलावी, उप वन संरक्षक साकेत शेंडे, उप वन संरक्षक यशवंत नागुलवार, वन परिक्षेत्र अधिकारी विवेक राजूरकर, मानद वन्यजीव रक्षक शाहिद खान आणि नदीम खान आहेत. दुर्घटना स्थळी लघु पटबंधारे विभाग कार्यकारी अभियंता व त्यांची चमू उपस्थित होती.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here