पटेल यांनी सन २०१५ मध्ये पाटीदार समाजाला आरक्षण मिळावे याबाबतच्या आंदोलनाशी संबंधित राजद्रोहाच्या प्रकरणाचा सामना करत आहेत. पटेल यांना अटक केल्यानंतर त्यांना चार दिवसांनंतर जामीन देण्यात आला होता. मात्र, पाटन आणि गांधीनगर जिल्ह्यांमध्ये दाखल केलेल्या प्रकरणांमध्ये त्यांना पुन्हा अटक करण्यात आली होती. पटेल यांना २४ जानेवारी या दिवशी जामीन मिळाल होता.
कनिष्ठ न्यायालयाने पुन्हा एकदा सुनावणीला हजर न राहिल्यामुळे पटेल यांच्या विरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आले होते. हार्दिक पटेल यांना १८ जानेवारीला अटक केल्यानंतर ते बेपत्ता असल्याचे किंजल यांचे म्हणणे आहे. ते कुठे आहेत हे आम्हाला माहीत नाही, मात्र पोलीस आम्हाला वारंवार तेच विचारत आहेत, असा तक्रारीचा सूर किंजल यांनी लावला आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times