कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लसीकरणाची गती वाढवण्याचा प्रयत्न मुंबई महानगरपालिकेने सुरू केला आहे. लशी वेळेत आणि पुरेशा प्रमाणात उपलब्ध व्हाव्यात यासाठी मुंबई महापालिकेनं कोरोना लशींसाठी काढलं आहे. या टेंडरद्वारे १ कोटी डोस उपलब्ध करवून घेण्याचा महापालिकेचा प्रयत्न आहे. मात्र, हे टेंडर काढल्यानंतर प्रवीण दरेकर यांनी राज्य सरकारला आपल्या टीकेचे लक्ष्य केले आहे. महापालिकेचा हा प्रयत्न म्हणजे फार्स सुरु असल्याचे प्रवीण दरेकर यांनी म्हटले आहे.
काढणारी मुंबई महापालिका ही पहिलीच महापालिका आहे. महापालिकेने काढलेले टेंडर भरण्याची शेवटची तारीख १८ मे ही असल्याची माहिती महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली आहे. वर्क ऑर्डर पूर्ण झाल्यानंतर संबंधित कंपन्यांना ३ आठवड्यांमध्ये लशींचा साठा द्यावा लागणार आहे. या बरोबरच त्यांना आयसीएमआर आणि डीजीसीआयच्या नियमावलीचे पालन देखील करावे लागणार आहे. आवश्यकता निर्माण झाल्यास या कंपन्यांना कोल्ड स्टोरेजची देखील व्यवस्था करावी लागू शकते.
क्लिक करा आणि वाचा-
टेंडरमधील नियमांनुसार, करोना लशींची परिणामकारकता ६० टक्क्यांहून कमी असता कामा नये, असे महापौर म्हणाल्या. या कंपन्यांना आगाऊ पेमेंट करण्यात येणार नसल्याचेही त्या म्हणाल्या. जर कंपन्या वेळेत लस देऊ शकल्या नाहीत, तर त्यांना दंड देखील आकारण्याची तरतूद आहे.
क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times