जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत ही रेमडेसिवीर इंजेक्शन नागपूर आणि महाराष्ट्रात वितरीत करण्यात येणार असल्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटले आहे.
गडकरींनी केला मुख्यमंत्री ठाकरे यांना फोन
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दूरध्वनीवरून वर्धेतील ‘जेनेटिक लाइफ सायन्सेस’मध्ये रेमडेसिवीर इंजेक्शनच्या उपलब्धतेबद्दल माहिती दिली. तसेच महाराष्ट्रात योग्य नियोजन करून त्याचे वाटप करण्यासंदर्भात चर्चा केली. वर्ध्यातील जेनेटिक लाईफ सायन्सेस कंपनीत ५ मे रोजी रेमडेसिव्हीर इंजेक्शनच्या उत्पादनाला सुरुवात झाली होती.
क्लिक करा आणि वाचा-
काही दिवसापूर्वी राज्यात रेमडेसिव्हीरचा तुटवडा जाणवत असताना या इंजेक्शनचा मोठ्या प्रमाणावर काळाबाजार देखील होत होता. या पार्श्वभूमीवर नितीन गडकरी यांनी जेनेटिक सायन्स लॅबला रेमडेसिव्हीर उत्पादन करण्याची परवानगी मिळवून दिली होती. या इंजेक्शनचे उत्पादन विदर्भात व्हावे असा गडकरी यांचा प्रयत्न होता. गडकरींच्या पाठपुराव्याने वर्धेतील जेनेटिक लाइफ सायन्सेस या कंपनीत रेमडेसिव्हीरचे उत्पादन करण्यात येत आहे. गडकरी यांनी ७ मे या दिवशी या कंपनीला भेट दिली होती आणि त्यावेळी त्यांनी कंपनीत होणाऱ्या उत्पादनाची पाहणी देखील केली होती.
क्लिक करा आणि वाचा-
कंपनीत दिवसाला सुमारे ३० हजार व्हायल इतके उत्पादन होणार असल्याची माहिती कंपनी प्रशासनाने दिली आहे. गरज ओळखून हे उत्पादन ५० हजार व्हायल पर्यंत वाढविण्याचे संकेतही कंपनीने दिले होते.
क्लिक करा आणि वाचा-
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times