: कोविड विषाणूच्या दुसऱ्या लाटेने नागपूर जिल्हा अक्षरशः होरपळून निघाला आहे. करोना प्रादुर्भाव संख्या गुणाकार पद्धतीनेच वाढल्याने गेल्या काही महिन्यांपासून व्हेंटिलेटर्स आणि ऑक्सिजनसाठी संघर्ष सुरू आहे. मात्र अशा स्थितीतही एकट्या इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील ४४ व्हेंटिलेटर्सनी मान टाकल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे.

कोविड रुग्णांवरील उपचारासाठी नागपुरात मेयो आणि मेडिकल अशी दोन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात जम्बो डेडिकेटेड कोविड केअर सेंटर आहेत. या दोन्ही रुग्णालयांवर कोविड उपाचाराची मोठी जबाबदारी आहे. त्यामुळं तिथे मेडिकल आवश्यक साधनांची सातत्याने गरज असते. मेयोमध्ये पीएम केअर निधीतून १५० आणि राज्य शासनाकडून ४० व्हेंटिलेटर्स उपलब्ध करून देण्यात आली होती. त्यापैकी १३ कायमची कोमात गेली आहे.

पीएम केअर निधीतून मिळालेल्या व्हेटिंलेटर्सबद्दल धक्कादायक दावा!
‘पंतप्रधान योजनेतून उपलब्ध झालेल्या काही व्हेंटिलेटर्समध्ये सुरुवातीपासूनच बिघाड होत आहे. या बाबत देखभाल दुरुस्तीची जबाबदारी असलेल्या संबंधित कंपनीशी वारंवार पत्रव्यवहार झाला आहे. त्यांच्याकडून फारसा प्रतिसाद मिळालेला नसला तरी ३१ व्हेंटिलेटर्समधील बिघाड दूर करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न केले जात आहेत,’ असं ‘मेयो’च्या डॉ. अजय केवलीया यांनी सांगितलं आहे.

ही जीवरक्षक प्रणालीच मृत झाल्याने रुग्णांने आणखी हाल होत आहेत. सर्वांत चिंताजनक बाब म्हणजे याच रुग्णालयातील आणखी ३१ व्हेंटिलेटर्स देखभाल दुरुस्ती अभावी बंद पडली आहेत.

तंत्रज्ञांची कमतरता
‘मेयो’त हे यंत्र हाताळणीसाठी सुमारे १५ ते १६ तंत्रज्ञांची गरज आहे. माात्र प्रत्यक्षात येथे ५ तंत्रज्ञ सेवेत आहेत. या उपकरणांची वेळोवेळी देखभाल दुरुस्तीच होत नसल्याने कोट्यवधींच्या यंत्रांमध्ये बिघाड झाल्याचे सांगितले जात आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here