म. टा. प्रतिनिधी, पुणे

पुणे शहर, पिंपरीच्या तुलनेत जिल्ह्याच्या ग्रामीण भागाला लोकसंख्येच्या तुलनेत लसींचा सम प्रमाणात पुरवठा न झाल्याने ग्रामीण भागात कमी प्रमाणात झाले आहे. जिल्ह्याच्या ग्रामीण भागात ३१ टक्के नागरिकांना पहिला तर केवळ सहा टक्के नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे. त्यामुळे आता दोन्ही शहरांच्या तुलनेत जिल्ह्याच्या ग्रामीण भागाला समप्रमाणात लस उपलब्ध करावी, अशी मागणी जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष निर्मला पानसरे यांनी केली. ( rates have declined in )

दोन महिन्यांत २०४४ मृत्यू

करोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये संसर्गाची तीव्रता अधिक असल्याने गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाच्या वर्षी मार्च आणि एप्रिल मे महिन्यात सर्वाधिक मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे. दोन महिन्यात सुमारे २०४४ जणांचा मृत्यू झाला असून त्यामध्ये ज्येष्ठांमध्ये सर्वाधिक महिलांचा समावेश असल्याची माहिती पुढे आली.

गेल्या वर्षी शहरात करोनाचा संसर्ग सुरु झाला. एप्रिलमध्ये पहिला मृत्यू झाला. त्यानंतर बाधित रुग्णांची संख्या आणि मृतांची संख्या वाढली. मे पासून खऱ्या अर्थाने रुग्णसंख्या वाढताना दिसून आली. त्याबरोबरीने रुग्णांचा मृत्यू झाल्याचे आढळले. तेव्हापासून साठीच्या पुढील रुग्णांचा सर्वाधिक रुग्ण होत असल्याचे निरीक्षण नोंदविण्यात आले.

क्लिक करा आणि वाचा-
पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात बाधितांच्या वाढत्या संख्येबरोबरच मृत्यूसंख्येत वाढ होत आहे. जिल्ह्यातील मृत्यूदर १.३ टक्के इतका असून तालुकानिहाय मृत्यूदराचा विचार केला तर भोर, जुन्नर आणि वेल्हा तालुक्यात सर्वाधिक मृत्यूदर असल्याचे दिसून येते. बारामती, इंदापूर आणि मुळशी तालुक्यात सर्वात कमी मृत्यूदर आढळला आहे.

क्लिक करा आणि वाचा-

‘खाटांचे नियोजन करावे’
खाटांच्या उपलब्धतेबाबत मुंबई उच्च न्यायालयाने घेतलेल्या अनुभवानंतर पुणे महापालिकेने नियंत्रण कक्षातील कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यापेक्षा या कर्मचाऱ्यांना सातत्याने अचूक माहिती पुरवणे योग्य ठरेल. त्यासाठी धर्मादाय आयुक्तांकडे नोंद असलेल्या खाटांचे नियोजन करावे, अशी मागणी इंडियन असोसिएशन ऑफ मेडिकल इन्फॉर्मेटिक्सचे माजी अध्यक्ष डॉ. राजीव जोशी यांनी केली आहे.

क्लिक करा आणि वाचा-
उच्च न्यायालयाने पुणे महापालिकेच्या नियंत्रण कक्षाला फोन करून खाटाची माहिती घेतली. त्यावेळी पुणे महापालिकेचे पितळ उघडे पडले. त्याबाबत नेमक्या पर्यायाबाबत डॉ. जोशी यांनी महापालिका आयुक्तांना निवेदन दिले. त्या निवेदनात त्यांनी मागणी करताना पर्याय सुचविला आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here