सिंधुदुर्ग: भारताचा युवा क्रिकेटपटू विनापास मुंबईहून कोल्हापूर मार्गे गोव्याला चालला होता. येथे पोलिसांनी त्याला ई-पासची विचारणा केली असता पृथ्वी शॉ जवळ कोणत्याही प्रकारचा ई-पास नव्हता. त्यामुळे आंबोली पोलिसांनी आधी पास दाखवा, मगच पुढे जा असा पवित्रा घेतला. त्यामुळे मैदानावर शौर्य दाखविणारा पृथ्वी चांगलाच गोंधळून गेला. अखेर त्याने ऑनलाइन पास काढून तो दाखविला व मगच त्याला गोव्याकडे मार्गस्थ होण्याची परवानगी मिळाली. ( )

वाचा:

राज्यात करोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी ब्रेक द चेन अंतर्गत कडक लॉकडाऊन असतानाही भारताचा युवा क्रिकेटपटू पृथ्वी शॉ हा मित्रांसोबत मुंबईहून कोल्हापूर मार्गे गोव्याकडे जाण्यास निघाला होता. त्याची कार काल सकाळी साडे अकराच्या सुमारास आंबोली पोलीस दूरक्षेत्राजवळ आली असता आरोग्य विभागाने त्याची व सोबतच्या मित्रांची आरोग्य तपासणी केली. त्यानंतर पोलिसांनी ई-पास तपासणीसाठी मागितला असता त्याच्याजवळ कोणत्याही प्रकारचा पास नसल्याचे स्पष्ट झाले. त्यावर पोलिसांनी पास शिवाय तुम्हाला पुढे जाता येणार नाही असे सांगत त्यांना तिथेच थांबवले. त्यानंतर पृथ्वी शॉ याने आंबोली येथून ऑनलाइन पद्धतीने ई-पाससाठी अर्ज केला. एका तासाने त्याचा पास तयार झाला. त्यानंतर मोबाइलवर पोलिसांना पास दाखवून तो गोव्याकडे मार्गस्थ झाला.

वाचा:

दरम्यान, पोलिसांच्या सतर्कतेमुळे पृथ्वी शॉ याला ही गोवावारी चांगलीच आठवणीत राहणार आहे. मुख्य म्हणजे येथून सिंधुदुर्ग जिल्हा गाठेपर्यंत पृथ्वी शॉ याला कुठेच ई-पास बाबत विचारणा करण्यात आली नसल्याबद्दलही आश्चर्य व्यक्त होत आहे. मुंबईकर पृथ्वी यंदाच्या मोसमात दिल्ली कॅपिटल्स संघाकडून खेळत आहे. आयपीएलच्या बायो बबलची तटबंदी भेदून करोनाने तिथेही शिरकाव केल्याने तूर्त ही स्पर्धा स्थगित ठेवण्यात आली आहे. त्यामुळे खेळाडूंनाही सध्या उसंत मिळाली आहे.

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here