मुंबईः जलसंपदा विभागाच्या सचिवांच्या नियुक्तीवरुन मंत्रिमंडळ बैठकीत वाद झाल्याची माहिती समोर येत आहे. मुख्य सचिव यांच्यावर नाराज असल्याचं बोललं जात आहे. तर, या प्रकरणावरुन महाविकास आघाडीतही कुरबुरी सुरु झाल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. या संपूर्ण घडामोडीवर राज्याचे उपमुख्यमंत्री यांनी भाष्य केलं आहे.

उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यात करोना परिस्थितीची आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी प्रसारमाध्यमांसोबत संवाद साधताना जयंत पाटील यांच्याबाबत प्रश्न विचारला असता अजित पवारांनी या प्रकरणावर स्पष्टच उत्तर दिलं आहे.

‘जयंत पाटील वरिष्ठ नेते आहेत. अनेक वर्ष त्यांनी राज्याचं अर्थ मंत्रालय सांभाळलं, गृह मंत्रालय सांभाळलं, ग्रामविकास मंत्रालय सांभाळलं आता ते जलसंपदा मंत्रालय सांभाळतात. त्यांच्या कामाची पद्धत पाहता ते शांत स्वभावाचे असून अधिकाऱ्यांकडून काम करुन घेणारे आहे. उलट जरा तापट स्वभावाचा व कडक बोलणारा मीच आहे. ते तर एकदम माझ्याविरुद्ध आहेत. या बातम्या कशा आल्या, कधी आल्या माहित नाही,’ असं म्हणत अजित पवारांनी या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे.

‘या वादात काही तथ्य नाहीये. हा प्रशासनाचा भाग असतो. प्रशासनातील मुख्यमंत्री आणि मंत्री तसेच मुख्य सचिव आणि अधिकारी आम्ही काही पहिल्यांदाच मंत्री झालेलो नाहीत अनेक वर्ष आम्ही प्रशासनचा एक भाग आहोत,’ असं अजित पवारांनी म्हटलं आहे.

ऑक्सिजन वाढवण्याची तयारी

करोना रोखण्यासाठी लसीकरण आणि ऑक्सिजन वाढवण्याची तयारी सुरू आहे. सध्या राज्याची १२०० मेट्रिक टन ऑक्सिजनची तयारी आहे असं ते म्हणाले. तर भारतीय बायटेकने पुण्यामध्ये लसीकरण निर्मिती करण्यासाठी तब्बल २८ एकर जमिनीची मागणी केली असून त्यासाठी सगळ्या परवानग्या देण्यात आल्याची माहितीही अजित पवारांनी दिली.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here