: शहरातील पाच पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील सराईत गुन्हेगार भरत किसन मेकाले याला सोलापूर शहर पोलीस ( Police) आयुक्तालयाच्या पोलिसांनी एमपीडीए कायद्यानुसार १३ मे रोजी स्थानबद्ध केले असून त्याची रवानगी येरवडा कारागृहात करण्यात आली आहे.

भरत मेकाले हा सावकारी व्यवसाय करीत होता आणि लोकांकडून तसेच व्यापाऱ्यांकडून १५ ते २० टक्क्यांपर्यंत व्याज घेत असल्याची तक्रार विविध पोलिस ठाण्यात दाखल होती. घातक शस्त्रानिशी हल्ला करणे, खंडणी मागणे, दुखापत करणे, जबरी चोऱ्या करणे, टोळी जमवून गैरकृत्य करणे अशा विविध गंभीर गुन्ह्यांसाठी ओळखला जात होता. त्यामुळे पोलीस त्याचा शोध घेत होते.

मेकाले याने सार्वजनिक सुव्यवस्थेला बाधा निर्माण केली असल्याचे लक्षात आल्यामुळे त्याच्याविरुद्ध २०१९ व २०२० मध्ये प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली होती. मेकाले याच्याविरुद्ध जमीन बळकावणे यासारखे गंभीर स्वरूपाचे गुन्हे देखील दाखल करण्यात आले.

गुंड भरत मेकाले याच्याविरुद्ध वेळो-वेळी कार्यवाही करूनही वर्तनात सुधारणा न झाल्याने एमपीडीए अधिनियम १९८१ अन्वये स्थानबद्धतेचे आदेश काढण्यात आले होते. त्यानंतर अखेर त्याची रवानगी येरवडा कारागृहात करण्यात आली आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here