नांदेड शहरातील हॅप्पी क्लबचे सदस्य मागील वर्षभरापासून सर्व धर्मीय करोना मृतांचे अंत्यसंस्कार करत आहेत. आजपर्यंत 950 करोना मृतांवर त्यांनी अंत्यसंस्कार केले आहेत. आज ईद असूनही या करोना योध्यांनी ख्रिश्चन समाजाच्या पद्धतीने करोना मृतकाचा अंत्यसंस्कार केला. हा महिना पवित्र रमजानचा महिना असून रमजानमध्ये उपवासातही हैप्पी क्लबच्या सदस्यांनी मृतांवर अंत्यसंस्कार केले.
करोना काळात जिथे रक्ताचे नाते ओळख दाखवत नाही, जवळ येत नाही अशी अनेक उदाहरणे आहेत. अशात हॅप्पी क्लब सगळ्यांसमोर माणुसकीचा आदर्श ठेवत आहेत. सामाजिक सलोख्याचे यापेक्षा दुसरे उदाहरण असू शकत नाही.
आज रमजान ईद असतानाही ईद साजरी करून हे तरुण मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी स्मशानभूमीत सेवा करत आहेत. देशात हिंदू-मुस्लिम असा वाद असला तरी माणुसकीपेक्षा कुठलाही धर्म नाही हेच यातून स्पष्ट होतं.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times