: सोलापूर जिल्ह्यातील खेडभाळवणी ता. पंढरपूर येथे दिनांक २९ जुलै २००९ रोजी दुपारी ३ वाजताच्या सुमारास जमिनीलगतचा शेतकरी कोंडीबा तुकाराम बनसोडे यास जातीवाचक शिवीगाळ आणि त्याच्या कुटुंबातील लोकांना मारहाण केल्याच्या आरोपातून राजेंद्र बाबासाहेब जगन्नाथ साळुंखे रा. खेडभाळवणी यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील ३ महिलांसह ७ जणांवर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र या प्रकरणी आज पंढरपूर सत्र न्यायालयाने साळुंखे कुटुंबातील सातही जणांची निर्दोष मुक्तता केली आहे.

‘फिर्यादीच्या भावाने घटनेच्या दिवशी आरोपीच्या घरातील एका महिलेचा विनयभंग केला होता. त्या घटनेला शह देण्यासाठी आरोपींना ॲट्रॉसिटी प्रकरणात खोटेपणाने गुंतविले आहे. ॲट्रॉसिटी कायद्याच्या कसा दुरुपयोग केला जातो, याचा हा खटला म्हणजे मूर्तिमंत उदाहरण आहे,’ असा युक्तिवाद आरोपीचे वकील ॲड.धनंजय माने यांनी न्यायालयात केला.

विशेष म्हणजे फिर्यादीच्या भावाविरुद्ध करण्यात आलेल्या विनयभंगाच्या खटल्यात त्याने गुन्हा कबूल केला असल्याबाबतची कागदपत्रे आरोपी पक्षातर्फे न्यायालयात सादर करण्यात आली होती.

त्यांनतर सर्व युक्तीवाद ऐकून न्यायालयाने पुराव्याच्या आधारे साळुंखे परिवारातील सदस्यांची निर्दोष मुक्तता केली आहे. या खटल्याचे कामकाज आरोपींतर्फे ॲड. धंनजय माने,ॲड. जयदीप माने,ॲड. सिद्धेश्वर खंडागळे आणि ॲड. विकास मोटे यांनी पाहिले.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here