आज राज्यात एकूण ६९५ करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. काल ही संख्या ८१६ इतकी होती. सध्या राज्यातील मृत्यूदर १.५ टक्के इतका आहे. याबरोबर राज्यात आज ५३ हजार २४९ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत, तर आतापर्यंत एकूण ४७ लाख ०७ हजार ९८० रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८८.६८ टक्क्यांवर पोहोचले आहे.
पुण्यातील सक्रिय रुग्णांच्या संख्येत होतेय घट
राज्यातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ५ लाख १९ हजार २५४ इतकी झाली आहे. राज्यातील विविध जिल्ह्यांमधील सक्रिय रुग्णांचा विचार करता पुणे जिल्ह्यात सक्रिय रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. पुण्यात एकूण ९६ हजार २८ इतके रुग्ण आहेत. मुंबई पालिका हद्दीत हा आकडा ३५ हजार ८४५ इतका आहे. ठाणे जिल्ह्यात सध्या ३१ हजार ५२६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर नागपूर जिल्ह्यात ही संख्या ४० हजार ४९६ इतकी झाली आहे. नाशिकमध्ये सक्रिय रुग्णांची संख्या १८ हजार ९२३ इतकी आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times