म. टा. प्रतिनिधी, पुणे

शहरात नवीन रुग्णांपेक्षा करोनातून बरे होणाऱ्या व्यक्तींची संख्या सलग १५ व्या दिवशी वाढली. शुक्रवारी दिवसभरात ३ हजार ३१८ व्यक्ती करोनातून बऱ्या झाल्या. तर, १ हजार ८३६ नवे बाधित आढळून आले. ३० एप्रिलपासून करोनामुक्त व्यक्तींची संख्या सातत्याने वाढत असून करोना बाधितांची संख्या कमी होत आहे. (The number of patients recovering from Corona disease has increased in Pune city)

दिवसभरात १३ हजार ९०८ जणांची चाचणी करण्यात आली. मागील चोवीस तासांत ७२ जणांचा मृत्यू झाला. यापैकी २४ रुग्ण पुण्याबाहेरील आहेत. शहरात सक्रिय रुग्णांची संख्या २३ हजार ६९२ झाली आहे. गेल्या महिन्यात सक्रिय रुग्णांच्या संख्येने पन्नास हजारांचा टप्पा गाठला होता. सक्रिय रुग्णांची संख्या निम्म्याने घटली असल्याने आरोग्य यंत्रणेवरील ताण कमी झाला आहे.

सध्या ६ हजार ५ रुग्णांवर ऑक्सिजनसह उपचार सुरू आहेत, तर १ हजार ३८१ गंभीर रुग्ण आहेत. आत्तापर्यंत २३ लाख ४० हजार २१० हजार जणांची करोना चाचणी करण्यात आली. यापैकी ४ लाख ५६ हजार २९३ जण करोनाबाधित आढळून आले. यापैकी ४ लाख २४ हजार ९९० जण करोनामुक्त झाले आहेत. आत्तापर्यंत ७ हजार ६११ जणांचा मृत्यू झाला आहे.

क्लिक करा आणि वाचा-
जिल्ह्यात शुक्रवारी ६ हजार २३७ नवीन रुग्ण आढळून आले, तर ८ हजार ६११ जण बरे झाले. दिवसभरात १२८ जणांचा मृत्यू झाला. आत्तापर्यंत १५ हजार ६५ जणांना प्राण गमवावे लागले आहेत.

क्लिक करा आणि वाचा-
नवीन रुग्ण-१,८३६
बरे झालेले रुग्ण-३,३१८
गंभीर रुग्ण-१,३८१
दिवसभरातील मृत्यू-७२ (२४ रुग्ण पुण्याबाहेरील)

क्लिक करा आणि वाचा-

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here