म. टा. प्रतिनिधी, सांगली

वेगाने पसरणाऱ्या करोनाला हरवून रोज शेकडो रुग्ण घरी परत येत आहेत. त्यांना शरीराच्या व्याधीपासून मुक्तता मिळाली असली तरी, करोनाने निर्माण केलेल्या अनेक प्रश्नांनी ते अस्वस्थ झाले आहेत. बदलत्या सामाजिक परिस्थितीमुळे करोनाबाधितांच्या कुटुंबीयांनाही अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. अशा कठीण परिस्थितीत त्यांच्या मनाला सावरण्यासाठी सांगली जिल्हा प्रशासन आणि शुश्रुषा सल्ला मार्गदर्शन व प्रशिक्षण संस्थेने पुढाकार घेतला आहे. कोव्हीड रुग्ण व नातेवाईकांचे मानसिक स्वास्थ्य जपण्यासाठी ‘चला होऊ या..!’ हा अभिनव उपक्रम सुरू केला आहे, अशी माहिती मानसतज्ञ कालिदास पाटील यांनी दिली. ( initiatives to help the in )

उपक्रमाबाबत अधिक माहिती देताना मानसतज्ञ कालिदास पाटील म्हणाले, कोव्हिड आपत्तीमुळे सुरू झालेल्या शारीरिक व्याधी, कुटुंबातील, जवळच्या नात्यातील व्यक्तींचा आकस्मित मृत्यू, आर्थिक, व्यावसायिक ताण यामुळे सामान्य माणसामध्ये भविष्यकालीन चिंता काळजी व निराशेचे प्रमाण वाढत चालले आहे. त्यामुळे बिघडलेले नातेसंबंध, अपयशाची भीती, व्यसनाधीनता यातून निराशेपोटी येणाऱ्या आत्महत्येच्या विचारांना थोपविण्यासाठी मानसशास्त्रीय पद्धतीने समुपदेशन करण्याचे काम सुरू आहे.

महाराष्ट्रात प्रथमच सांगली जिल्ह्यामध्ये सुरू झालेल्या या प्रकल्पात कोल्हापूर येथील छत्रपती शाहू इन्स्टिट्युट ऑफ बिझनेस अँड रिसर्च सेंटरच्या (SIBER) समाज विज्ञान विभागातील ८५ विद्यार्थी व प्राध्यापकांनी मनोमित्र म्हणून सहभाग घेतला आहे, तर महाराष्ट्रातील तज्ज्ञ व अनुभवी अशा १२० मानसतज्ञानी सांगली जिल्ह्याच्या कोव्हीड कुटुंबाच्या मानसिक स्वास्थ्याची जबाबदारी स्वीकारली आहे. नुकतेच या योजनेअंतर्गत कोव्हीड आपत्तीनंतर येणाऱ्या मनोसामाजिक समस्या, समुपदेशन कौशल्य अशा विषयावर प्रशिक्षण पूर्ण झाले आहे.

क्लिक करा आणि वाचा-
हेल्पलाईनसह प्रत्यक्ष भेटीतून सध्या दररोज सरासरी ५०० कुटुंबांना मानसिक आधार देण्याचे काम सुरू आहे. मानसिक स्वास्थ्य योग्य नसणाऱ्या व्यक्तीचे अचूक निदान करण्यासाठी ऑनलाईन मानसशास्त्रीय चाचणीची शुश्रुषा संस्थेने निर्मिती केली आहे. यानुसार प्रसिद्ध मानसशास्त्रज्ञ डॉ. भरत देसाई, प्राचार्य डॉ. आर. के. अडसूळ, मराठी मानसशास्त्र परिषदेचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. पी. व्ही. रसाळ, डॉ. संज्योत देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षित मानसतज्ञ कार्यरत आहेत. आपल्या मनातील मानसिक स्वास्थ्य विषयक प्रश्नांसाठी १८००१०२४७१०/ 9422627571 या मोफत हेल्पलाईन नंबरवर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

क्लिक करा आणि वाचा-

क्लिक करा आणि वाचा-

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here