नवी दिल्लीः दिल्लीतील एका कोविड इमर्जन्सी वार्डमधील ( ) एक व्हडिओ काही कालावधीपूर्वी समोर आला होता. या व्हिडिओत करोना बाधित एका ३० वर्षीय महिलेने ऑक्सिजन मास्क लावलेला होता. आणि ती बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान याचा चित्रपट ‘डियर जिंदगी’मधील टायटल ट्रॅक ‘लव यू जिंदगी’ या गाण्यावर डुलताना ( ) दिसत होती. सोशल मीडिया मीडियावर हा व्हिडिओ खूप व्हायरल झाला. पण आता ही महिला नाहीए. करोनाने तिचा मृत्यू झाला ( ) आहे.

डॉ. मोनिका लांगेह यांनी या महिलेचा व्हिडिओ ट्वीटरवर शेअर केला. आम्ही गेल्या १० दिवसांपासून कोविड इमर्जन्सी वॉर्डमध्ये या महिलेवर देखरेख ठेवून आहोत. त्यांना आयसीयू बेड मिळत नव्हता. पण आम्ही तो उपलब्ध करून दिला. त्या आता NIVsupport वर आहे. त्यांना रेमडेसिवीरसह प्लाझ्माथेरेपी देण्यात आली आहे. एक धीट महिला असून त्यांची इच्छाशक्ती दांडगी आहे. मला गाणं वाजता येईल, असं त्यांनी आम्हाला विचारलं. आम्ही त्यांना परवानगी दिली, असं ट्वीट ८ मे रोजी डॉ. लांगेह यांनी केलं होतं.

यानंतर डॉ. लांगेह यांनी १३ मे रोजी आणखी एक ट्वीट केलं. यात त्या महिलेचा करोनाने दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती त्यांनी दिली. या महिलेला एक लहान मुलगाही आहे. तो आपल्या आई बरी होण्याची वाट पाहात होता. डॉक्टर लांगेह यांनी या महिलेचा व्हिडिओ शेअर केल्यानंतर खूप व्हायरल झाला होता. पण या महिलेच्या मृत्युची बातमी कळल्यानंतर अनेकांनी शोक व्यक्त केला.

युवक काँग्रेसचे अध्यक्ष श्रीनिवास बी. व्ही. यांनी हा व्हिडिओ शेअर करत त्या महिलेला श्रद्धांजली वाहिली.

देशात करोना व्हायरसच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले आहे. या लाटेत नागरिकांच्या मृत्युचे प्रमाण वाढले आहे. दुसरीकडे ऑक्सिजन, औषधं आणि लसींचा तुटवडा आहे. या परिस्थितीमुळे देश हादरला आहे. काही रुग्ण असेही आहेत जे हसत हसत करोनाविरोधात शेवटच्या श्वासापर्यंत झुंज देत आहेत.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here