मुंबई: मुंबईतील संसर्गाचा विळखा वेगाने सैल होताना दिसत आहे. क्षेत्रात शुक्रवारीही नवीन करोना बाधित रुग्णांची संख्या २ हजारच्या आतच राहिली. २४ तासांत मुंबईत १ हजार ६५७ नवीन रुग्णांची नोंद झाली. हा मुंबईसाठी रुग्णसंख्येचा आणखी एक निचांक ठरला आहे. दरम्यान, मुंबईत शुक्रवारी ६२ रुग्ण दगावले तर २ हजार ५७२ रुग्ण करोनावर मात करून घरी परतले. ( )

वाचा:

मुंबईतील करोनाचा उद्रेक हा सर्वांसाठीच चिंतेचा विषय बनला होता. मात्र, महापालिकेने अत्यंत नियोजनबद्धपणे या संकटाचा सामना करत स्थिती नियंत्रणात आणली आहे. एप्रिल महिन्यात मुंबईतील दैनंदिन करोना बाधितांचा आकडा ११ हजारांपर्यंत पोहचला होता. हा आलेख काही आठवड्यांतच घसरला आहे. गेले काही दिवस रुग्णसंख्या दोन हजारांपर्यंत खाली आली आहे.

मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाने केलेल्या नोंदीनुसार शुक्रवारी १ हजार ६५७ नवीन रुग्णांची भर पडली तर त्याचवेळी २ हजार ५७२ रुग्ण करोनावर मात करून घरी परतले. २४ तासांत करोनाने ६२ रुग्ण दगावले असून मृतांचा एकूण आकडा आता १४ हजार १३८ इतका झाला आहे. मुंबईत आतापर्यंत ६ लाख ३१ हजार ९८२ रुग्णांनी करोनावर मात केली असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढून आता ९२ टक्के झाले आहे. मुंबईत सध्या करोनाचे ३७ हजार ६५६ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत तर रुग्णवाढीचा दर ०.३४ टक्के इतका आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे मुंबईतील रुग्ण दुपटीचा कालावधी वाढून आता १९९ दिवसांवर गेला आहे. शुक्रवारी एकूण २५ हजार २०५ चाचण्या घेण्यात आल्या. झोपडपट्टी व चाळींमध्ये सध्या ८५ सक्रिय कंटेनमेंट झोन आहेत तर ३७७ इमारती सील करण्यात आलेल्या आहेत.

वाचा:

दरम्यान, मुंबईत १५ आणि १६ मे असे दोन दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. चक्रीवादळाचा व मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिल्याने खबरदारी म्हणून महापालिकेने दोन दिवस लसीकरण केंद्रे बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत अतिरिक्त आयुक्त यांनी माध्यमांना माहिती दिली. ज्येष्ठ नागरिकांना कोणत्याही प्रकारे त्रास होऊ नये म्हणून विशेषत: हा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले.

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here