काउन्सिल ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्च, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी, सेंटर फॉर सेल्युलर अँड मॉलिक्युलर बायोलॉजी आणि अकॅडमी ऑफ सायंटिफ्कि अँड इनोव्हेटिव रिसर्च या संस्थांनी मिळून हा अभ्यास केला आहे. ७ महिन्यांत केलेल्या अभ्यासात करोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेचा अभ्यास करण्यात आला आहे.
पाण्यात आढळून आलेल्या मटेरियलने पुढच्या लाटेचा अंदाज लावणं कठीण
शहरांमधून जे प्रक्रिया न केलेले सांडपाणी आणि प्रदुषित पाणी वाहून आले आहे त्यातूनच करोना व्हायरचे जेनेटिक मटेरियल तलावांमध्ये पसरले आहे. पण या जेनेटिक मटेरियल ने पुढे प्रादुर्भाव वाढला नाही. पण देशात सुरू असलेली करोनाची दुसरी लाट आणि येणाऱ्या लाटेचा अंदाजाकरता अभ्यासासाठी उपयोग केला जाऊ शकतो.
दुसऱ्या देशातही अभ्यास, पाण्यातून संसर्गाचे पुरावे नाहीत
जगातील इतर देशांमध्येही अनेक ठिकाणी अभ्यास सुरू आहे आणि करण्यात येत आहेत. यात पाण्यात व्हायरस आहे की नाही? याचा तपास करण्याच्या प्रयत्न केला गेला. पण पाण्यात आतापर्यंत जे जेनेटीक मटेरियल आढळले आहे तो व्हायरस नाहीए. यामुळे पाण्याद्वारे चेहरा आणि किंवा तोंडातून संसर्ग वाढण्याची शक्यता कमी आहे, असं CCMB च्या संचालकांनी सांगितलं होतं.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times