वाचा:
वकिलामार्फत एक कोटी ७० लाख रुपयांची लाच स्वीकारल्याच्या प्रकरणात भूमी अभिलेख विभागाचे उपसंचालक असताना बाळासाहेब वानखेडे याला अटक केली होती. त्यानंतर वानखेडेच्या मालमत्तेची उघड चौकशी केली जात होती. या चौकशीत १९८९ ते २०१९ या दरम्यान वानखेडेकडे उत्पन्नापेक्षा ८८ लाख ८५ हजार रुपयांची मालमत्ता जास्त असल्याचे आढळून आले. त्यानुसार वानखडे व त्याची पत्नी (वय ५४) या दोघांविरोधात मुंढवा पोलिस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमाच्या विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वाचा:
बाळासाहेब वानखेडे हा सध्या सेवानिवृत्त आहे. त्याच्या व कुटुंबीयांच्या नावे असलेल्या पुणे शहर, मुंबई, अकोला, अमरावती या जिल्ह्यातील मालमत्ता व घरांची लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडून झडती घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस आयुक्त या याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.
वाचा:
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times