मुंबई : महानायक सोशल मीडियावर सक्रीय असतात. आपल्या चाहत्यांसाठी ते सातत्याने काही ना काही गोष्टी शेअर करत असतात. अनेकदा त्यांच्या पोस्ट या उद्बोधक, वैचारिक तर कधी मनोरंजक असतात. परंतु कधी कधी काही गोष्टी पोस्ट करताना त्यांच्याकडूनही चुका होतात. परंतु त्या चुका लक्षात आल्यावर अथवा लक्षात आणून दिल्यावर माफी मागायला अमिताभ बच्चन मागे पुढे पाहत नाहीत. आपली चूक स्वीकारत ती सुधारतात. अमिताभ बच्चन यांनी अलिकडेच आपल्याकडून चूक झाल्याचे मान्य केले. इतकेच नाही तर ती चूक सुधारली देखील.

सोशल मीडियावर अमिताभ बच्चन अनेकदा त्यांच्या वडिलांच्या म्हणजे कवी यांच्या कविता शेअर करत असतात. काही दिवसांपूर्वी त्यांनी करोना योद्धे आणि फ्रंटलाइन कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढवण्याच्या उद्देशाने एक कविता आपल्या आवाज म्हणत पोस्ट केली होती. या कवितेचे श्रेय त्यांनी चुकून आपल्या वडिलांना दिले होते. परंतु काही वेळाने त्यांनी हा व्हिडीओ डिलीट केला. व्हिडीओ डिलीट करताना त्यांनी ही कविता यांची असल्याचे सांगितले. याआधीही अनेकदा अमिताभ बच्चन यांनी कवितेचे श्रेय चुकीच्या व्यक्तीला दिले होते. आपली ही चूक लक्षात आल्यानंतर त्यांनी लगेचच माफीही मागितली आहे.

अमिताभ बच्चन यांनी जी कविता म्हटली होती ती अशी होती…

‘रुके ना तू, धनुष उठा प्रहार कर,

तू सबसे पहला वार कर,

अग्नि सी धधक-धधक,

हिरण सी सजग-सजग,

सिंग सी धहाड़ कर,

शंख सी पुकार कर,

रुके ना तू थके ना तू, झुके न तू ‘

ही कविता सादर करतानाचा व्हिडीओ पोस्ट करताना त्यांनी या कवितेचे श्रेय प्रसून जोशी यांचे असल्याचा उल्लेख केला आहे.

या कवितेच्या शेवटी अमिताभ बच्चन म्हणतात की, ‘हे शब्द आपल्या सर्वांना हिंमत देतात, आपल्याला हरायचे नाही असा धीर देतात. हे शब्द कोणतेही संकट काळामध्ये झुंजणाऱ्या प्रत्येकाला धीर देतात. मला असे वाटते की हे शब्द कोविड योद्धे आणि फ्रंटलाइनवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी अगदी योग्य आहेत.’

अमिताभ बच्चन पुढे म्हणता, ‘हे सर्व करोना योद्धे त्यांचे सर्वस्व पणााला लावून आपल्यासाठी काम करत आहेत. ही वेळ त्यांना पाठिंबा देण्याची आहे तसेच करोना युद्धामध्ये त्यांच्या साथीने लढण्याची देखील आहे. ही आपली देखील लढाई आहे. त्यामुळे आपल्याला जसे शक्य होईल तसे योगदान या लढ्यात द्यायला हवे. भारतासाठी आपण सर्वांनी एकत्र यायला हवे.’

अमिताभ बच्चन यांनी ही कविता पोस्ट केल्यानंतर गीतकार प्रसून जोशी यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ते म्हणाले, ‘ सध्याच्या कठीण काळामध्ये माझी ‘रुके न तू’ ही कविता प्रेरणा देणारी ठरते आहे, असे म्हणणाऱ्या अमितजींचे मनापासून धन्यवाद. त्यांनी ही कविता अतिशय मनापासून वाचली आहे. तसेच इंटरनेटवर ही कविता ज्येष्ठ कवी हरिवंश राय बच्चन यांची असल्याचा उल्लेख होत आहे, परंतु त्याचे मला दुःख नाही. कारण त्यांच्या तोडीचा मला समजले जात असेल, तर ते मी माझे भाग्य समजतो. सरस्वती देवीचे याबद्दल मी आभार मानतो.’

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here