नागपूर : मेडिकलशी संलग्न सुपर स्पेशालिटी रुग्णालयातल्या चौथ्या माळ्यावरून खाली कोसळल्याने एका ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शनिवारी सकाळी नऊ वाजता ही दुर्दैवी घटना घडली. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून पोलीस तपास सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे.

तुळशीराम बांगडे (वय ६५) असे या दुर्दैवी ज्येष्ठ नागरिकाचे नाव आहे. तुळशीराम यांच्या मूत्रमार्गात अडळथा निर्माण झाल्याने ते मेडिकलशी संलग्न असलेल्या सुपर स्पेशालिटी रुग्णालयात उपचाराला आले होते. आज युरॉल़ॉजी विभागात बाह्यरुग्ण तपासण्याचा दिवस असल्याने त्यांच्यावर आज दुर्बिणीद्वारे लेप्रोस्कोपिक प्रोसिजरही केली जाणार होती.

यासाठी तुळशीराम सकाळी सुपरच्या चौथ्या माळ्यावर आले होते. गर्दी असल्याने ते कठड्यावर.बसले असता तोल जाऊन ते खाली कोसळले. पोर्चमध्ये मोठा आवाज झाल्याने गार्ड तिकडे धावले. मात्र, तोवर तुशळीराम रक्ताच्या थारोळ्यात पडले होते.

तुळशीराम यांना तातडीने मेडिकलच्या अपघात विभागात रेफर करण्यात आले. तिथे पोहण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी अजनी पोलिसांनी आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलीस पुढील तपास करत असल्याची माहिती आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here