: महाराष्ट्रातील ग्रामीण भागात संसर्गाची साखळी तोडण्यात अद्याप यश येत नसल्याने निर्बंध आणखी कडक केले जात आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातही लॉकडाऊनबाबत निर्ण घेण्यात आला असून लक्ष्मीनारायण मिश्रा, जिल्हादंडाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण रत्नागिरी यांनी सदरचा आदेश दिला आहे.

कोणत्याही वाहनाने अन्य संवेदनशील जिल्ह्यातून जसे की, कोल्हापूर, सांगली, सातारा या ठिकाणाहून रत्नागिरी जिल्ह्यात प्रवेश करणाऱ्या व्यक्तींनी RTPCR निगेटिव्ह चाचणी अहवाल सोबत बाळगणे आवश्यक राहील. सदरचा अहवाल प्रवेशाच्या ४८ तासांपूर्वीचा असावा, किंवा mhpolice वेबसाईट कडून मिळालेला अधिकृत ई-पास वाहनासोबत ठेवणे बंधनकारक राहील. त्याशिवाय रत्नागिरी जिल्ह्यामध्ये प्रवेश दिला जाणार नाही

मालवाहतूक करणाऱ्या वाहनांच्या बाबतीत फक्त दोन व्यक्तींस ( ड्रायव्हर + क्लीनर / मदतनीस) प्रवास करण्याची परवानगी राहील. जर कार्गो वाहतूक ही राज्याबाहेरील असेल तर त्या वाहनातील कर्मचाऱ्यांनी RTPCR निगेटिव्ह चाचणी अहवाल सोबत बाळगणे आवश्यक आहे. सदर अहवाल रत्नागिरी जिल्ह्यातील प्रवेशाच्या ४८ तासांपूर्वीचा असावा व तो ७ दिवसांकरीता वैध राहील.

मेडीकल दुकाने, आरोग्य विषयक सेवा, व आरोग्य विषयक आस्थापना २४ तास कार्यरत राहतील.

रत्नागिरी जिल्ह्यात नागरी व ग्रामीण भागामध्ये नाशवंत वस्तूंमध्ये मोडणारे भाजीपाला, फळे, व दूध विक्रेत्यांची दुकाने सकाळी ७ ते ११ यावेळेत सुरु ठेवता येतील. तथापि, त्याठिकाणी सामाजिक अंतर राखणे व गर्दी टाळणे बंधनकारक राहील. गर्दी होत असल्याचे निदर्शनास आल्यास ती तात्काळ बंद करण्यात येतील. नाशवंत वस्तू जसे की, भाजीपाला, फळे, व दुध वगळून अन्य सर्व प्रकारची दुकाने बंद राहतील. त्यांना केवळ घरपोच सेवा पुरविता येईल.

सदरचा आदेश संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्याच्या क्षेत्रासाठी (प्रतिबंधीत क्षेत्र वगळून) लागू राहील. यापूर्वीच्या आदेशान्वये घातलेले निर्बंध व सूट या आदेशासह कायम राहतील. सदरच्या आदेशाची अंमलबजावणी दिनांक १७ मे रोजीचे सकाळी ७ वाजले पासून ते दिनांक २३ मे रोजीचे रात्री १२ वाजेपर्यंत अंमलात राहील असे आदेशात म्हटले आहे.

सांगलीमध्ये लॉकडाऊन वाढवला!
करोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात पाच मे पासून १५ मे पर्यंत कडक लॉकडाऊन पाळण्यात आला, याचा परिणाम करोना कमी झाला नसला तरी ३० टक्‍क्‍यांपर्यंत स्थिर झाला. तो कमी करण्याच्या दृष्टीने सर्व लोकप्रतिनिधींशी चर्चा करून जिल्ह्यात आणखी तीन दिवस म्हणजे १७ मे पर्यंत लॉक डाऊन वाढविण्यात आला. परिस्थितीचा आढावा घेऊन पुढील निर्णय सोमवारी घेण्यात येईल, अशी माहिती सांगलीचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी दिली आहे.

Ratnagiri News | रत्नागिरी बातमी | Ratnagiri News in Marathi | Ratnagiri Local News – Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here