“सर्व जंबो कोविड सेंटर्सला स्टँडबायवर रहाण्यास सांगण्यात आलं आहे. गरज भासल्यास रुग्णांना इतर ठिकाणी हलवण्यात येईल. दुपारपर्यंत यासंबंधी महत्त्वाची माहिती येईल. आम्ही परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवून आहोत,” अशी माहिती किशोरी पेडणेकर यांनी दिली आहे.
अधिक माहितीनुसार, बीकेसी कोविड सेंटरला २० रूग्णवाहिका सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. पालिकेकडून आदेश आल्यास रुग्ण हलवणार अशी माहिती बीकेसी कोविड सेंटरमधील डाॅ. राजेश डेरे यांनी दिली आहे. ज्यांची प्रकृती बरी आहे, येत्या काही दिवसात घरी पाठवले जाईल अशा रूग्णांना
मुलुंड कोविड सेंटरमधून हलवले जाते आहे. दुपारी २० ते २५ रूग्ण मुलुंड मिठागर कोविड सेंटरमध्ये हलवले आहेत. पाच रुग्ण मुलुंड जकात नाका येथे नवीन कोविड सेंटरमध्ये हलवण्यात आले आहेत. मुलुंड कोविड सेंटर आणि एम. टी. अगरवाल रूग्णालयाचे अधीक्षक डाॅ. प्रदीप आंग्रे यांनी ही माहिती दिली आहे.
दरम्यान, मुंबई चक्रीवादळाच्या धोक्यामुळे सर्व लसीकरण केंद्र बंद ठेवण्यात आली आहेत. इतकंच नाहीतर वांद्रे वरळी सी लिंक हे 15 मे आणि 16 मे रोजी वाहतुकीसाठी बंद करण्यात आलं आहे.
किशोरी पेडणेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, आपत्कालीन बचावसाठी समुद्रकिनाऱ्यावर सुमारे १०० लाइफगार्ड्स तैनात करण्यात आले असून अग्निशमन दलाचे पथकही उभं करण्यात आलं आहे.
हवामान खात्याकडून अलर्ट जारी
भारतीय हवामान खात्याने(आयएमडी) शनिवारी दिेलेल्या माहितीनुसार, लक्षद्वीप आणि अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र तीव्र झाल्यामुळे ‘तौक्ते’ चक्रीवादळ निर्माण झालं आहे. यामुळे 17 मे ते 18 मे दरम्यान भूस्खलन होण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे. या चक्रीवादळाचा परिणाम गुजरात, महाराष्ट्र, केरळ, तामिळनाडू आणि कर्नाटक या पाच राज्यांमध्ये होणार आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times