मुंबई– यश म्हटलं की त्याआधी केलेला संघर्ष आलाच. प्रत्येक गोष्टीसाठी संघर्ष हा अटळच. मेहनत केल्याशिवाय काहीही साध्य होत नाही. यशाचं शिखर चढायचं तर एक एक पायरी चढायलाच हवी. असाच एक हॉलिवूड अभिनेता ज्याला यश मिळवण्यासाठी इतरांपेक्षा जरा जास्तच मेहनत करावी लागली आणि आज तो हॉलिवूडच्या लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. आम्ही बोलत आहोत हॉलिवूड अभिनेता याच्याबद्दल. अॅशटनला बालपणापासूनच प्रत्येक गोष्टीसाठी संघर्ष करावा लागला पण त्याच संघर्षामुळे आज अॅशटन यशस्वी अभिनेता आणि मॉडेल आहे.

अॅशटन जेव्हा १३ वर्षांचा होता तेव्हा त्याच्या मोठ्या भावाचं हार्ट ट्रान्सप्लान्ट केलं जाणार होतं. परंतु अॅशटनला या शस्त्रक्रियेसाठी डोनर मिळत नव्हता. अखेर अॅशटन एवढा निराश झाला की त्याने त्याच इस्पितळाच्या छतावरून उडी मारून आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला जेणेकरून त्याच्या मृत्यूनंतर त्याचं हृदय त्याच्या भावाला दिलं जाईल. याचा खुलासा स्वतः अॅशटनने एका मुलाखतीत केला होता.

जेव्हा अॅशटन १६ वर्षांचा झाला तेव्हा त्याच्या आई- वडिलांचा घटस्फोट झाला. अॅशटनच्या कुटुंबात आधीच पैशांची चणचण होती आणि घटस्फोटानंतर तर पैशांची आणखीनच अडचण भासू लागली. पैशांची गरज भागवण्यासाठी अॅशटनला त्याचं रक्त विकून शाळेची फी भरावी लागत होती. त्यामुळे त्याने आपल्या चुलत भावसोबत मिळून दोनवेळा शाळेत घुसून पैसे चोरण्याचाही प्रयत्न केला होता. परंतु, तो त्यात यशस्वी होऊ शकला नव्हता.

भावाच्या उपचारासाठी अॅशटन युनिव्हर्सिटी ऑफ लोवामध्ये शिकण्यासाठी गेला. परंतु, तिथूनही त्याला काढून टाकण्यात आलं. या सर्व अडचणींमुळे अॅशटन आणखीनच दृढ बनत गेला. आज अॅशटनला जगभरात कोट्यवधी लोक ओळखतात. कित्येक मुली त्यांच्यावर जीव ओवाळून टाकतात. मॉडेलिंगपासून आपल्या कारकिर्दीची सुरवात करणारा अॅशटन आज टीव्ही आणि चित्रपटांमधील एक प्रसिद्ध चेहरा बनला आहे. ज्याची कमाई आज अब्जो रुपयांमध्ये आहे. त्याने अनेक स्टाट- अप सुरू केले असून अॅशटन एका मोबाइल कंपनीचा प्रोडक्ट इंजीनिअरदेखील आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here