राजेंद्र ताजने यांनी रुग्णालयात दाखल होत असताना थेट रॅम्पवरून वाहन चढवले. त्यानंतर रुग्णालय प्रशासनाशी बाचाबाची करत गोंधळ घातला. या सर्व घटनेमुळे रुग्णालय परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं.
भाजप नगरसेविका सीमा ताजने यांचे पती असलेले राजेंद्र ताजने हे याआधीही आपल्या वर्तनामुळे अनेकदा चर्चेत आले होते. त्यानंतर आज लोकप्रतिनिधीच्या पतीनेच कोविड सेंटरमध्ये गोंधळ घातल्याने शहरात या प्रकरणाची चर्चा होत आहे.
दरम्यान, राज्यभरातील अनेक ठिकाणी अजूनही करोना रुग्णांना आरोग्य सुविधा मिळवताना मोठा संघर्ष करावा लागत आहे. नाशिकमध्ये करोनाचा प्रादुर्भाव कमी व्हावा, यासाठी लॉकडाऊन करण्यात आलं. मात्र अजूनही रुग्णसंख्या अपेक्षित प्रमाणात कमी झालेली नाही. त्यामुळे लोकांना व्हेंटिलेटर बेड आणि रेमडेसिवीर इंजेक्शनसारख्या गोष्टी मिळवताना अडचणी येत आहेत.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times