बेगुसराय

केंद्रीय मंत्री आणि भाजपचे खासदार गिरिराज सिंह यांचा एक व्हिडिओ सध्या तुफान व्हायरस होतोय. यात ते फोनवर एका पोलीस अधिकाऱ्याला फैलावर घेत असल्याचं दिसत आहे. एका व्यक्तीच्या मृत्यूचं प्रकरण उचलून धरत गिरिराज सिंह यांनी पोलीस अधिक्षकावर बेजबाबदारपणाचा ठपका ठेवला आहे. याशिवाय, पोलीस आरोपीला पाठिशी घालत असल्याचाही आरोप केला आहे.

मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबियांची भेट घेण्यासाठी गेलेल्या गिरिराज सिंह यांनी सर्वांसमोर पोलीस अधिक्षकाला फोन केला. फोनवर गिरिराज सिंह पोलीस अधिकाऱ्यावर भयंकर भडकले आणि वाद निर्माण झाला. ‘तुम्ही पोलीस दलात काय राक्षसांना बसवलं आहे का? ते सर्वांना मारहाण करुन घडलेली घटना अपघात असल्याचं भासवण्यास भाग पाडत आहेत. तुम्ही केवळ प्रामाणिक असल्याचं दाखवून काही होत नाही. आपल्याकडील अधिकाऱ्यांना पाठिशी घालणं म्हणजे प्रमाणिकपणा होत नाही’, असा संताप गिरिराज सिंह यांनी व्यक्त केला आहे.

नितीश कुमारांनी सांगावं की लोकांनी बेगुसराय सोडून जावं
ट्रान्सपोर्ट व्यवसायिक रविंद्र राय आणि रजवाडा येथील एका तरुणाच्या हत्येच्या प्रकरणावरुन गिरिराज सिंह पोलीस अधिक्षकावर चांगलेच भडकले. ‘रविंद्र रायची हत्या झाली हे तुम्हाला माहित नाही का? रजवाडा येथील तरुण मुलाची हत्या होते आणि तुम्ही त्याच्या कुटुंबियांनाच जेलमध्ये टाकलं? तुम्ही एकतर नितीश कुमार यांना सांगा की बेगुसराय जिल्हा रिकामा करुन टाका नाहीतर मी राजीनामा देतो’, अशी थेट धमकीच गिरिराज यांनी दिली.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here