ठाणे: येथील कॅम्प १ भागात इमारतीचा स्लॅब कोसळून भीषण दुर्घटना घडली आहे. याबाबत माहिती मिळताच , महापालिकेचे पथक आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून युद्धपातळीवर मदत आणि बचावकार्य सुरू करण्यात आले आहे. ( )

वाचा:

मोहिनी पॅलेस ही तळ अधिक चार मजल्यांची इमारत असून या इमारतीचा स्लॅब दुपारी १ वाजून ४० मिनिटांच्या सुमारास कोसळून ढिगाऱ्याखाली जवळपास १५ रहिवाशी अडकले होते. त्यातील ११ जणांना सुखरूपपणे बाहेर काढण्यात यश आले आहे. त्यातील दोन जण जखमी आहेत. ढिगाऱ्याखाली आणखी चार जण अडकले होते. या चारही जणांचा मृत्यू झाला आहे. त्यांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. हरिश डोडवाल, संध्या डोडवाल (४०), सावित्री पारचे (७५), मिलिंद पारचे (१२) अशी मृतांची नावे आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, चौथ्या मजल्यावरील स्लॅब कोसळून ही दुर्घटना घडली आहे. ही इमारत अनधिकृत असून १९९४ पासूनचे हे बांधकाम आहे. हे बांधकाम निकृष्ट दर्जाचे असल्यानेच ही दुर्घटना घडल्याची शक्यता पालिका प्रशासनाने व्यक्त केली आहे. दुर्घटनेची माहिती मिळताच पालिका आयुक्त तसेच स्थानिक आमदार घटनास्थळी दाखल झाले आहेत.

पत्त्याप्रमाणे स्लॅब कोसळला

उल्हानगरातील चरणदास दरबार समोर कॅम्प १ भागात मोहिनी पॅलेस ही इमारत आहे. या इमारतीच्या चौथ्या मजल्यावरील हॉलच्या भागाचा स्लॅब प्रथम कोसळला आणि पाठोपाठ पत्याप्रमाणे चारही मजल्यांचे स्लॅब कोसळून तळमजल्यावर आले. सध्या युद्धपातळीवर बचाव कार्य सुरू आहे. बचावकार्यासाठी ठाणे महानगरपालिकेकडील ठाणे आपत्ती प्रतिसाद दल (TDRF) (१ जीप, १ पिकअप, १५ जवान) व राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF) रवाना झाले आहेत.

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here