सिंधुदुर्ग: अरबी समुद्रात निर्माण झालेले चक्रीवादळ जिल्ह्यातील समुद्रात आज दाखल होणार आहे. पहाटे ४ वाजता जिल्ह्याच्या समुद्रात दाखल होणारे हे वादळ दुपारी २ वाजता जिल्ह्याची सीमा ओलांडून पुढे जाईल. त्यामुळे पहाटे ४ ते दुपारी २ या कालावधीमध्ये नागरिकांनी अधिक दक्ष रहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी केले आहे. दरम्यान, तौत्के चक्रीवादळ अधिक तीव्र होत चाललं असून हे वादळ मंगळवारी गुजरात किनारी धडकेल असा अंदाज आहे. ( )

अरबी समुद्रात निर्माण होणाऱ्या तौत्के या चक्रीवादळामुळे जिल्ह्यात रविवारी काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता प्रादेशिक हवामान विभाग, यांनी वर्तवली आहे. या वादळाच्या प्रभावाने महाराष्ट्र व गोवा किनारपट्टीवर रविवारी ताशी ६० ते ८० कि.मी. वेगाने वारे वाहणार आहेत. तसेच समुद्र खवळलेला राहणार आहे. या कालावधीत मच्छिमारांनी तसेच नागरिकांनी समुद्रात जाऊ नये, असा इशाराही हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. हे चक्रीवादळ आज पहाटे ४ च्या सुमारास गोव्याची सीमा ओलांडून सिंधुदुर्गच्या समुद्रात येणार असून दुपारी २ च्या दरम्यान सिंधुदुर्गची सीमा ओलांडून पुढे जाईल. त्यामुळे या काळात जिल्ह्यातील नागरिकांनी अधिक दक्ष राहणे गरजेचे असल्याचे जिल्हा प्रशासनाने सांगितले.

वाचा:

चक्रीवादळ कालावधीत विजा चमकणार असल्याने या कालावधीत पुढीलप्रमाणे दक्षता घेण्यात यावी:
– विजा चमकत असताना संगणक, टीव्ही इत्यादी विद्युत उपकरणे बंद ठेवून स्त्रोतांपासून अलग करून ठेवावीत. दूरध्वनी, भ्रमणध्वनीचा वापर टाळावा.
– विजा चमकत असताना नागरिकांनी घराबाहेर पडू नये. घराबाहेर असल्यास सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा.
– विजेच्या खांबांपासून लांब रहावे. विजा चमकत असताना उंच झाडाखाली आश्रयास थांबू नये.
– विजा चमकत असताना एखाद्या मोकळया परिसरात असल्यास, गुडघ्यामध्ये डोके घालून वाकून बसावे. धातूच्या वस्तू दूर ठेवाव्यात.

सोसाटयाचा वारा व मुसळधार पर्जन्यवृष्टी लक्षात घेवून नागरिकांनी पुढीलप्रमाणे सावधगिरी बाळगावी:

– मुसळधार पावसात व सोसाट्याच्या वाऱ्यात आवश्यकता नसल्यास घराबाहेर पडणे टाळा.
– घराबाहेर अथवा असुरक्षित ठिकाणी असल्यास पाऊस व वारा थांबेपर्यत सुरक्षित ठिकाणी आसरा घ्यावा.
– अतिमुसळधार व अतिवृष्टीच्या परिस्थितीत व सोसाट्याचा वारा वाहत असताना सुरक्षित ठिकाणी राहा व पायी अथवा वाहनाने प्रवास करू नका.
– पाऊस पडत असताना विजा चमकत असल्यास झाडाखाली उभे राहू नये. मोबाइलवर संभाषण करू नये आणि इलेक्ट्रिक वस्तूंपासून दूर रहावे. अशा परिस्थितीत पक्के घर किंवा इमारतीत आसरा घ्यावा.
– मुसळधार पावसामुळे उद्भवलेल्या कुठल्याही प्रकारच्या आपत्कालीन परिस्थितीमध्ये मदतीसाठी जिल्हा नियंत्र कक्ष-०२३६२-२२८८४७ किंवा टोल फ्री – १०७७ येथे संपर्क करावा.
– तालुका नियंत्रण कक्ष दोडामार्ग तालुक्यासाठी – ०२३६३-२५६५१८, सावंतवाडी तालुक्यासाठी – ०२३६३-२७२०२८, वेंगुर्ला तालुक्यासाठी – ०२३६६-२६२०५३, कुडाळ तालुक्यासाठी – ०२३६२- २२२५२५, मालवण तालुक्यासाठी – ०२३६५- २५२०४५,कणकवली तालुक्यासाठी – ०२३६७-२३२०२५, देवगड तालुक्यासाठी- ०२३६४- २६२२०४, वैभवाडी तालुक्यासाठी – ०२३६७- २३७२३९ या दूरध्वनी क्रमांवर संपर्क करावा.

वाचा:

अफवांवर विश्वास ठेवू नका

आपले पशुधन व अन्य पाळीव प्राणी यांना अगोदरच सुरक्षित ठाकणी हलवा, प्रशासनाकडून स्थलांतराची सूचना मिळल्यास त्याचे पालन करा. घर सोडून स्थलांतर करावे लागल्यास गॅस, वीज, पाणी कनेक्शन बंद करून घर सोडा. कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका व अफवा पसरवू नका. कोणत्याही बातमीची खात्री अधिकृत सूत्रांकडून करुन घ्यावी किंवा जिल्हा नियंत्रण कक्ष ०२३६२-२२८८४७ किंवा टोल फ्री – १०७७ या क्रमांवर संपर्क साधून बातमीची खातरजमा करावी. जुन्या मोडकळीस आलेल्या इमारती, पूल इ. ठिकाणी जाण्याचे टाळा. हवामान विभागाकडून, जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आलेल्या सूचनांचे पालन करून जीवित व मालमत्तेची काळजी घ्यवी, असे आवाहन के. मंजुलक्ष्मी यांनी केले आहे. या स्थितीवर पालकमंत्री उदय सामंत हे लक्ष ठेवून आहेत.

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here