जळगाव: शहरातील एमआयडीसीत असलेल्या एका खते तयार करणाऱ्या कंपनीतील कुंडातील गाळ काढताना तीन कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना आज दुपारी साडेबारा वाजता घडली. सुरुवातीला एक कामगार कुंडात पडल्यानंतर त्याला वाचवताना इतर दोघांचाही मृत्यू झाला. ( )

वाचा:

(वय ३५, रा. कांचननगर, जळगाव), (वय ५४, रा. कांचननगर, जळगाव) आणि रवींद्र उर्फ गोटू झगडू कोळी (वय ३०, रा. चिंचोली) अशी या घटनेतील मृतांची नावे आहेत. दरम्यान घटनास्थळी पोलीस अधिक्षक यांच्यासह अधिकाऱ्यांनी भेट देवून पाहणी केली.

जळगाव शहरातील एमआयडीसी परिसरात सेक्टर ए ८४/८५ मध्ये नावाची कंपनी आहे. ही कंपनी सुबोध चौधरी यांच्या मालकीची आहे. या कंपनीत ऑरगॅनिक कॅटल फीडसाठी लागणारे रसायन बनवले जाते. शनिवारी कंपनीतील दिलीप सोनार हा नेहमीचा कर्मचारी, रोजंदारीवरील कर्मचारी मयूर सोनारच्या मदतीने कंपनी परिसरातील एक कुंड साफ करत होता. त्याचवेळी दोघांमधील एक जण पाय घसरून सात ते आठ फूट खोल असलेल्या या कुंडात पडला. त्याला वाचवताना दुसराही पडला. हे दोघे जण पडल्याचे समजल्यानंतर ट्रान्सपोर्ट कर्मचारी रवींद्र कोळी त्यांना वाचवण्यासाठी गेला. तो देखील कुंडामध्ये गुदमरला. नंतर कंपनीतील इतर कामगारांनी घटनास्थळी धाव घेत दोरखंडाच्या साह्याने तिघांना बाहेर काढले. त्यांना तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात हलविण्यात आले. परंतु त्यांना वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृत घोषित केले.

वाचा:

कंपनीतील रसायन निर्मितीच्या प्रक्रियेतून निघणारा मैला साठवण्यासाठी एक कुंड तयार केले आहे. या कुंडाच्या तोंडाजवळ साधारणपणे ४ फूट खोल खड्डा आहे. त्यानंतर एल आकारात आतमध्ये हा कुंड ७ से ८ फूट खोल आहे. खड्ड्यात उतरल्यानंतर पाय घसरल्याने कामगार आतमध्ये गाळात पडून गुदमरल्याने त्यांचा मृत्यू झाला असावा असा अंदाज वर्तवला जात आहे. ही कंपनी ऑर्गेनिक खते आदी तयार करणारी कंपनी आहे. ईद, अक्षय तृतीया सण असल्याने गेल्या तीन दिवसांपासून कंपनीला सुट्टी होती. त्यामुळे भूमिगत टाकीत साचलेला गाळ काढण्याचे काम आज सकाळी हाती घेतले होते. हे काम तिघांच्या जीवावर बेतले. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, सहायक पोलीस अधीक्षक कुमार चिंचा, एमआयडीसी पोलीस ठाण्याचे निरीक्षक प्रताप शिकारे यांनी कंपनीत धाव घेत पाहणी केली. तेथील कर्मचाऱ्यांना घटनेविषयी माहिती विचारून घेत पोलिसांनी जाबजबाब नोंदवून घेतले. दरम्यान, या घटनेप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम उशिरापर्यंत सुरू होते.

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here