मुंबई: चक्रीवादळाचा परिणाम महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर जाणवू लागला आहे. रत्नागिरीत पावसाच्या हलक्या सरी सुरू झाल्या आहेत. तसेच आणि विशेषत: रत्नागिरीतील सुमारे १०४ गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. कोकण किनारपट्टीला हे वादळ थेट धडकरणार नसले तरी कोकण किनारपट्टी भागात मुसळधार पाऊस आणि वेगवान वारे वाहण्याची शक्यता आहे. ( at of maharashtra latest live update)
Live अपडेट…
>> अलिबाग: रायगड जिल्ह्याच्या जवळून जाणार, हवामान खात्याचा अंदाज.
>> कोल्हापूर जिल्ह्यालाही तौत्के चक्रिवादळाचा फटका, इचलकरंजीत रात्रीपासून मुसळधार पाऊस
>> रत्नागिरीतील एकूण १०४ गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
>> रत्नागिरीत पावसाच्या हलक्या सरी.
>> सिंधुदुर्ग जिल्ह्यात सोसाट्याच्या वारा अनेक ठिकाणी वीज पुरवठा खंडित
>> मुंबईतील विविध ठिकाणच्या करोना बाधित रुग्णांना सुरक्षित स्थळी हलवले.
>> शहर आणि उपनगरांमध्ये पावसाच्या हलक्या सरी.
>> मुंबईतील मुलुंडमध्ये काही ठिकाणी वीज पुरवठा खंडित.
>> मुंबईत जाणवला तौत्के चक्रीवादळाचा परिणाम, काही भागात सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाच्या सरी.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times