डॉ. कफील खान यांनी गेल्या वर्षी १२ डिसेंबरला उत्तर प्रदेशातील अलिगड मुस्लीम विद्यापीठात नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाविरोधातील आंदोलनादरम्यान चिथावणीखोर भाषण केल्याचा त्यांच्यावर आरोप करण्यात आला आहे. उत्तर प्रदेशच्या स्पेशल टास्क फोर्सने (यूपी एसटीएफ) डॉ. कफील यांना जानेवारी महिन्यात मुंबईतून अटक केली. त्यांच्या अटकेवर नंतर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते. मात्र न्यायिक प्रक्रियेचा भाग म्हणून डॉ. कफील यांना अटक करण्यात आली असल्याचे पोलिसांचे म्हणणे होते.
पोलिसांच्या म्हणण्यानुसार, कफील खान यांना द्वेष पसरवणारे भाषण केल्यामुळे अटक करण्यात आली होती. त्यांच्या विरोधात खटलाही दाखल करण्यात आला आहे. मला गोरखपूरच्या मुलांच्या मृत्यूप्रकरणी क्लिन चिट देण्यात आली होती. आता मला पुन्हा आरोपी बनवण्याचा प्रयत्न होत आहे. मला महाराष्ट्रातच राहू द्या अशी विनंती मी महाराष्ट्र सरकारला करत आहे. मला उत्तर प्रदेशच्या पोलिसांवर विश्वास नाही, असे यूपी एसटीएफने त्यांना अटक केल्यानंतर डॉ. कफील म्हणाले होते.
काही दिवसांपूर्वी गोरखपूरच्या बीआरडी मेडिकल कॉलेजमध्ये ६० मुलांचा मृत्यू झाल्याप्रकरणी डॉ. कफील यांना निलंबित करण्यात आले होते. त्यानंतर ते चर्चेत आले होते. मात्र, नंतर या प्रकरणी त्यांना क्लिन चिट देण्यात आली.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times