काँग्रेस नेते आणि काँग्रेस कार्यकारी समितीचे निमंत्रक राजीव सातव यांच्या निधनाचे वृत्त धक्कादायक आहे. महाराष्ट्रातील तरुण, तडफदार आणि अभ्यासू नेतृत्व अशी त्यांची ओळख होती, असेही पवार यांनी श्रद्धांजली वाहताना म्हटले आहे.
आमचे सहकारी व अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे महासचिव खासदार राजीव सातव यांचे अकाली निधन अतिशय वेदनादायी असून, नियतीने एका प्रतिभाशाली उमद्या नेतृत्वाला हिरावून घेतले आहे, अशा शब्दात काँग्रेसचे नेते आणि मंत्री यांनी सातव यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.
क्लिक करा आणि वाचा-
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष यांनीही राजीव सातव यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. आज माझ्यासाठी, तमाम कॉंग्रेसच्या कार्यकर्ता साठी काळाचा दिवस. माझा मित्र, माझा भाऊ राजीव सातव आज आमच्यात नाही. . भावपूर्ण श्रद्धांजली काय बोलाव काय लिहाव काही कळत नाही, ही हाणी कधीही न भरून निघणारी आहे, अशा शब्दात नाना पटोले यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
विधानसभेतील विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री यांनी काँग्रेस नेते राजीव सातव यांच्या निधनाचे वृत्त अतिशय धक्कादायक आणि दुःखद आहे, असे म्हटले आहे. तरुण, आश्वासक आणि अभ्यासू नेतृत्वाला महाराष्ट्र मुकला आहे, असे म्हणत फडणवीस यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे. या कठीण प्रसंगी हे दुःख सहन करण्याची शक्ती त्यांच्या कुटुंबियांना प्राप्त होवो, ही प्रार्थना करतो, असे फडणवीस यांनी पुढे म्हटले आहे.
क्लिक करा आणि वाचा-
माणुसकी जपणारा नेता गेला-
काँग्रेसचे खासदार व आमचे संसदेतील सहकारी राजीवजी सातव यांचे निधन झाले. ही आम्हा सर्वांसाठी अतिशय दुःखद बातमी आहे.त्यांनी कोरोना विषाणूशी जोरदार झुंज दिली. पण ही झुंज अपयशी ठरली. ते एक उत्तम संसदपटू तर होतेच याशिवाय ते माणूसकी जपणारे नेते होते, अशा शब्दात खासदार सुप्रिया सुळे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
क्लिक करा आणि वाचा-
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times