सातव यांना २२ एप्रिल रोजी करोनाची लागण झाली होती. तेव्हा पासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती चिंताजकन बनली होती. सातव यांना २२ एप्रिल रोजी करोनाने गाठल्यानंतर उपचारानंतर ते बरे झाले होते. मात्र त्यांची तब्येत पुन्हा बिघडली. त्यानंतर त्यांची प्रकृती गंभीर बनली. त्यांना सायटोमेगालो विषाणूचा संसर्ग झाला होता.
उद्या सोमवारी सकाळी १० वाजता हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी या त्यांच्या मूळगावी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे, अशी माहिती सतेज पाटील यांनी दिली. सातव यांचे पार्थिव पुण्याहून हिंगोलीकडे रवाना झाले आहे. रुग्णवाहिकेत सातव यांची आई, पत्नी आणि इतर अप्तेष्ट आहेत. उद्या सकाळी कळमनुरीमध्ये त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.
क्लिक करा आणि वाचा-
काँग्रेसचे तरुण, उमदे नेतृत्व
राजीव सातव यांच्याकडे अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे गुजरातचे प्रभारीपद होते. ते काँग्रेसच्या कार्यकारी समितीचे निमंत्रकही होते. राजीव सातव यांनी फेब्रुवारी २०१० ते डिसेंबर २०१४ असे चार वर्षे भारतीय युवक काँग्रेसचे अध्यक्षपद भूषवले होते. राजीव सातव यांच्या नेतृत्वात काँग्रेसने सन २०१७ मधील गुजरात विधानसभा निवडणुकीत चांगले यश मिळवले होते.
सातव यांनी सन २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे माजी खासदार सुभाष वानखेडे यांचा पराभव केला होता. ते हिंगोलीतून खासदारपदी निवडून आले होते. राजीव सातव यांच्या मातोश्री रजनी सातव काँग्रेसच्या आमदार होत्या.
क्लिक करा आणि वाचा-
सलग ४ वेळा मिळाला संसदरत्न सन्मान
खासदार राजीव सातव यांनी संसदेत वेळोवेळी विविध प्रश्नावर आवाज उठवला. संसदेत त्यांनी १,०७५ प्रश्न विचारले होते. तसेच त्यांनी २०५ वादविवादांमध्ये सहभाग घेतला होता. संसदेत त्यांची ८१ टक्के उपस्थिती दाखवली होती. या कार्याचा गौरव म्हणून त्यांना सलग चार वेळा ‘संसदरत्न’ पुरस्कार मिळाला होता.
क्लिक करा आणि वाचा-
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times