सोलापूरः काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे व आमदार प्रणिती शिंदे यांचे विश्वासू म्हणून ओळखले जाणारे यांचे शनिवारी निधन झाले. त्यांच्या निधनानंतर रविवारी त्यांच्या अंत्ययात्रेला जवळपास हजारोंची गर्दी जमली होती. या गर्दीमुळं सोलापुरात करोनाचा विस्फोट होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे आणि आमदार प्रणिती शिंदे यांचे कट्टर समर्थक आणि मोची समाजाचे युवा नेते करण म्हेत्रे यांचे शनिवारी दुपारी करोनामुळे निधन झाले होते. त्यांची अंत्ययात्रा आज दुपारी बारा वाजता निघाली होती. या अंत्ययात्रेत हजारोंचा जनसमुदाय उपस्थित होता. करोनाच्या कठीण काळात ही हजारोंची अंत्ययात्रा निघाल्याने सर्वांचेच डोळे विस्फारले आहेत. करोनाच्या संकटातही अंत्यसंस्कारासाठी हजारोंची गर्दी झाल्याने सोलापूरातील प्रशासकीय यंत्रणेची झोप उडाली आहे. करोना फैलावाच्या आपत्कालीन परिस्थितीत ही गर्दी करणाऱ्यांवर पोलीस प्रशासन गुन्हे दाखल करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

करण म्हेत्रे यांना करोनाची लागण झाल्याने मुळे हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होते. त्यानंतर त्यांना पुढील उपचारासाठी विनीत हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले होते. त्या ठिकाणी उपचार सुरु असताना शनिवारी दुपारच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला. यामुळे कार्यकर्त्यांवर एकच शोककळा पसरली. मृत्यूची माहिती मिळताच शेकडो कार्यकर्ते त्या हॉस्पिटलच्या परिसरात जमा झाले. आपला नेता गेल्याने कार्यकर्त्याचा आक्रोश दिसून आला.

करण हे काँग्रेसच्या माजी नगरसेविका अनिता म्हेत्रे यांचे पती होते. तसंच, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे व आमदार प्रणिती शिंदे यांचे ते कट्टर समर्थक मानले जात होते मोची समाजात त्यांच वजन होतं आमदार प्रणिती शिंदे यांच्या प्रत्येक निवडणुकीत त्यांचा पुढाकार दिसून यायचा. गरीब कुटुंबातून मोठ्या मेहनतीने करण यांनी समाजात वेगळे स्थान मिळवले होते. समाजातील सक्रिय युवा नेता गेल्याने मोची समाजातून दुःख व्यक्त करण्यात येत होते. त्यामुळे नेत्याच्या प्रेमापोटी उसळलेली ही गर्दी समाजाला करोना प्रादुर्भावाच्या खाईत तर लोटणार नाही ना? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here