मुंबई: रुग्ण सर्वाधिक विश्वास आपल्या फॅमिली डॉक्टरांवर ठेवतात, माझा डॉक्टर अशी ओळख असलेल्या या फॅमिली डॉक्टरांनी शासनासोबत यावे आणि त्यांनी गृह विलगीकरणात असलेल्या रुग्णांवर उपचार करावेत, शासन सर्व मदत द्यायला तयार आहे, असे आवाहन यांनी राज्यातील सर्व फॅमिली डॉक्टरांना केले आहे. पुढे आल्यास करोना रुग्णांवर योग्य वेळी योग्य उपचार मिळतील असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. ( appeals to family doctors to treat home quarantine covid patients)

जगभरात प्रत्येक घराचा एक स्वत:चा कुटुंबाचा डॉक्टर असतो. आपल्याला आपल्या त्या माझ्या डॉक्टरवर म्हणजे आपल्या फॅमिली डॉक्टरवर खूप विश्वास असतो. या डॉक्टरांनाही कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीची, त्याच्या प्रकृतीची संपूर्ण माहिती असते, घरातल्या लोकांचे आजार माहीत असतात, असे सांगतानाच आज मला तुमच्या या अनुभवाची गरज आहे, तुमच्या सहकार्याची आणि सेवेची गरज आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.

राज्यातील मृत्यूदर वाढत असून त्याची कारणे शोधली तर पेशंट उशिरा रुग्णालयात दाखल होतात हे कारण प्रामुख्याने समोर येते. रुग्ण घरच्या घरी अंगावर काही गोष्टी काढतात आणि उशिरा रुग्णालयात दाखल होतात. मला यामध्ये तुम्हा सर्वांचे सहकार्य हवे आहे गृह विलगीकरणात राहणाऱ्या रुग्णांचे उत्तम उपचार व्यवस्थापन होण्याची गरज यातून पुढे आली आहे, असे आवाहन मुख्यमंत्री ठाकरे यांनी फॅमिली डॉक्टरांना केले आहे.

कोविडमुळे रुग्णांच्या शरीरातील साखर वाढते, त्यात रुग्णास मधुमेह असेल तर स्थिती आणखी बिकट होते हे लक्षात घेऊन रुग्णाच्या रक्तातील साखर मर्यादित आणि स्थिर ठेवणे गरजेचे असते. हे आव्हानात्मक काम आहे, घरच्याघरी रुग्णाच्या उपचाराची जबाबदारी घेतलेल्या फॅमिली डॉक्टरांनी याकडे लक्ष द्यावे असेही मुख्यमंत्री म्हणाले.

क्लिक करा आणि वाचा-

जवळच्या जम्बो कोविड केअर रुग्णालयात सेवा द्यावी

माझा डॉक्टरांनी त्यांना शक्य असेल तिथल्या, त्यांच्या परिसरातील जम्बो कोविड केअर सेंटरमध्ये सेवा देण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले. त्यामुळे शासनाला सहकार्य तर होईलच पण आपल्या भागातील डॉक्टर आपल्याला येऊन पाहून गेल्याचा आनंद ही रुग्णांना मिळेल.

क्लिक करा आणि वाचा-
आज राज्य टास्कफोर्समधील सर्व डॉक्टरर्स आपल्याला मार्गदर्शन करत आहेत, उपचार पद्धती, औषधांचा वापर, त्याचे परिणाम, दुष्परिणाम सगळ्या गोष्टींवर ते आपल्याशी बोलतील, आपल्या शंकांचे निरसन करतील. मला विश्वास आहे आपण सगळे चांद्यापासून बांद्यापर्यंतचे “माझा डॉक्टर” म्हणून ज्यांची महाराष्ट्रातील प्रत्येक कुटुंबाला ओळख आहे ते या लढाईत उतरले तर आपण कोविडला महाराष्ट्रातून हद्दपार केल्याशिवाय राहणार नाही.

क्लिक करा आणि वाचा-
आता पावसाळा उंबरठ्यावर येऊन पोहोचला आहे. पावसाळा म्हटले की साथीचे आजार आले, लिप्टो आला, मलेरिया आणि डेंग्यु बरोबर ताप, सर्दी, खोकला पडसे आले. या साथीच्या आजारांना रोखण्याचे मोठे आव्हान आपल्या समोर असल्याचे व त्यात माझा डॉक्टर म्हणून काम करणाऱ्या फॅमिली डॉक्टरची भूमिका खुप महत्वाचे असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here