बुलडाणाः राज्यात करोनाचा प्रादुर्भाव वाढत असतानाच तिसऱ्या लाटेचं नियोजनही राज्य सरकारकडून करण्यात येत आहे. यापार्श्वभूमीवर राज्याचे विरोधीपक्ष नेते यांनी तिसऱ्या लाटेच्या नियोजनाबाबत भाष्य केलं आहे. ‘करोनाच्या तिसऱ्या लाटेत प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. म्हणूनच या संदर्भात तयारी केली पाहिजे, लहान मुलांचे आयसीयु असतील, लहान मुलांकरता वेगळी व्यवस्था असतील. या व्यवस्था प्रत्येक जिल्ह्यात उभ्या करणं आवश्यक आहे,’ अशा सूचना फडणवीस यांनी दिल्या आहेत.

बुलडाणा जिल्ह्यात करोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने चिखली येथे भाजपा आमदार श्वेता महाले यांनी गरीब रुग्णांसाठी आधार कोविड केअर सेंटर सुरू केलं आहे. या सेंटरचे उद्घाटन आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते. आधार कोविड केअर सेंटरमध्ये एकूण ७० बेडची व्यवस्था करण्यात आली असून त्यातील २० बेड व्हेन्टीलेर आहेत. स्त्री पुरुष रुग्णांसाठी वेगवेगळ्या बेडची व्यवस्या करण्यात आली आहे. यावेळी माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, माजी मंत्री आमदार संजय कुटे, आमदार आकाश फुंडकर, आमदार चैनसुख संचेती, विजयराज शिंदे यावेळी उपस्थित होते.

‘पंतप्रधान मोदी यांनी तिसऱ्या लाटेसंदर्भात सूचना दिल्या आहेत आणि राज्यात त्याप्रमाणे कार्यवाही करण्याची आवश्यकता आहे. पंतप्रधानाच्या माध्यमातून महाराष्ट्राला सर्वच जास्त रेमडेसिव्हिर इंजेक्शन प्राप्त झाले आहेत. सर्वात जास्त ऑक्सिजन, रेमडेसिव्हीर हे महाराष्ट्राला प्राप्त झाले. आता मोठ्या प्रमाणत हे जे ऑक्सिजनेटर आहे ते देखील केंद्र सरकारच्या माध्यमातून महाराष्ट्राला दिल्या जात आहे,’ असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

‘करोनाच्या या लढाईमध्ये भेदभाव न करता आपण सर्वांनी एकत्र येऊन कोरोना रुग्णांच्या पाठीशी उभ राहून त्यांना या अडचणीतून कसं बाहेर काढता येईल यासाठी प्रयत्न करावा लागणार आहे, असंही मत यावेळी त्यांनी व्यक्त केलं आहे. दरम्यान, यावेळी फडणवीस यांना पत्रकारांनी शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी केलेल्या वक्तव्यावर प्रश्न विचारला असता त्यांनी ‘ईश्वर त्यांना सुबुद्धी देवो’ इतकं बोलून पुढचं बोलणं टाळलं आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here