इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉनने आता कोहलीवर सडकून टीका केल्याचे पाहायला मिळत आहे. वॉनने पुढे म्हटले आहे की, ” केन विल्यम्सन हा जर भारताचा क्रिकेटपटू असला असता तर तो जगातील सर्वश्रेष्ठ खेळाडू म्हणून गणला गेला असता. पण विराट कोहली असताना मात्र असे होऊ शकत नाही. कारण केन हा भारतीय नाही. त्याचबरोबर काहीवेळा विराटला महान क्रिकेटपटू म्हणावे लागते, नाहीतर तुमच्यावर सोशल मीडियावर चांगलाच रोष ओढवून घ्यावा लागतो.”
वॉनने पुढे सांगितले की, ” केन विल्यम्सन हा कोहलीपेक्षा जास्त यशस्वी ठरलेला क्रिकेटपटू आहे. क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात केन हा सर्वोत्तम क्रिकेटपटू आहे. पण तरीही तो विराट कोहलीची बरोबरी करू शकत नाही. कारण त्याच्याकडे कोहलीसारखे फॉलोअर्स नाहीत. कोलहीचे इंस्टाग्रामवर १०० मिलियन फॉलोअर्स आहेत. त्याचबरोबर विराटला जाहिरातीही भरपूर मिळतात आणि त्याची कमाईही चांगली होती. पण हे सर्व केनला मिळत नाही.”
भारत आणि न्यूझीलंड यांच्यामध्ये विश्व अजिंक्यपद कसोटी स्पर्धेची अंतिम फेरी खेळवण्यात येणार आहे. हा सामना इंग्लंडमध्ये होणार आहे. सध्याच्या घडीला भारतीय संघ हा कसोटी क्रमवारीत अव्वल स्थानावर आहे, तर न्यूझीलंडचा संघ दुसऱ्या स्थानावर आहे. पण इंग्लंडमधील या अंतिम फेरीत कोणता संघ बाजी मारतो, याकडे संपूर्ण क्रिकेट विश्वाचे लक्ष असेल. त्याचबरोबर विराट आणि केन यांच्या नेतृत्वावरही सर्वांचे लक्ष असेल. त्यामुळे या सामन्यात नेमके काय होते, याची उत्सुकता सर्वांनाच असेल. त्यामुळे आता सर्वांनाच उत्सुकता या अंतिम फेरीचा असणार आहे. या सामन्यासाठी भारतीय संघाची निवडही करण्यात आली आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times