नवी दिल्ली : ऑस्ट्रेलियाच्या संघाने केलेले बॉल टॅम्परिंग प्रकरण चांगलेच गाजले होते. त्यानंतर स्टीव्हन स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नर यांना एका वर्षाची बंदीही घालण्यात आली होती. पण आता या बॉल टॅम्परिंग प्रकरणात आता एक नवीन खुलासा झालेला आहे. यामुळे आता क्रिकेट विश्वात पुन्हा एकदा भुकंप येऊ शकतो, असे चिन्ह दिसत आहे.

दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर असताना २०१८ साली ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंकडून बॉल टॅम्परिंगचा प्रकार घडला होता. दक्षिण आफ्रिकेच्या एका माजी गोलंदाजाने हा प्रकार उघडकीस आणला होता. त्यानंतर क्रिकेट जगताला मोठा धक्का बसला होता. त्यावेळी ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्हन स्मिथ होता. त्याचबरोबर या प्रकरणात डेव्हिड वॉर्नर आणि कॅमेरुन बॅनक्रॉफ्ट यांची नावं समोर आली होती. आता या बॅनक्रॉफ्टनेच मोठा खुलासा केला आहे.

बॅनक्रॉफ्टने गार्डियन या वृत्तसंस्थेला एक मुलाखत दिली आहे आणि त्यामध्ये त्याने हा मोठा खुलासा केला आहे. यावेळी बॅनक्रॉफ्ट म्हणाला की, ” मी जे काही केलं त्यासाठी मी स्वत:ला जबाबदार मानतो. त्याचबरोबर ही गोष्ट फक्त मलाच माहिती होती, असे मला वाटत होते. पण ही गोष्ट गोलंदाजी करणाऱ्या ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूलाही माहिती होती. या बॉल टॅम्परिंगमुळे गोलंदाजाला फायदा होणार होता. पण ही गोष्ट त्याला माहिती नाही, असे मला वाटत होते. पण ही गोष्ट त्या गोलंदाजालाही माहिती होती.”

बॉल टॅम्परिंग प्रकरणात स्मिथ, वॉर्नर आणि बॅनक्रॉफ्ट यांच्यावर बंदीची कारवाई करण्यात आली होती. पण गोलंदाजावर मात्र कोणतीच कारवाई झाली नव्हती. पण आता बॅनक्रॉफ्टने जो मोठा खुलासा केला आहे. त्यामुळे आता गोलंदाजावरही बंदीची कारवाई येऊ शकते. त्याचबरोबर या प्रकरणाचा तपास पुन्हा एकदा सुरु करण्यात येऊ शकतो. या नवीन तपासामध्ये आता ही गोष्ट स्मिथ, वॉर्नर आणि बॅनक्रॉफ्ट या तिघांव्यतिरीक्त कोणाला माहिती आहे, याचा तपास केला जाऊ शकतो. जर या तपासामध्ये स्मिथ, वॉर्नर आणि बॅनक्रॉफ्ट यांच्याबरोबर अन्य ज्या व्यक्तीला ही गोष्ट माहिती असल्याचे समोर आले तर त्याच्यावर कडक कारवाई होऊ शकते. त्यामुळे जर या प्रकरणात आणखी काही नावं समोर आली तर क्रिकेट जगताला तो मोठा धक्का असू शकतो.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here