भारतातील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी आणि इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चचे शोधपत्र जरनल क्लिनिकल इन्फेक्शिय डिसीजेसमध्ये प्रकाशित झाले आहे. कोवॅक्सिन व्हायरस करोनाच्या सध्याच्या सर्व व्हेरियंटविरोधात पुरेशा प्रमाणात प्रतिकारशक्ती निर्माण करते, असं भारत बायोटेकने म्हटलं आहे.
देशातील करोनाच्या दुसऱ्या लाटेमागे B.1.167 हा व्हेरियंट असल्याचं बोललं जातंय. या व्हेरियंटविरोधात कोवॅक्सिन लस पुरेशा प्रमाणात अँटीबॉडी निर्माण करण्यात यशस्वी झाली आहे. भारत बायोटेकच्या सहसंस्थापक आणि सहव्यवस्थापकीय संचालक सुचित्रा एल्ला यांनी यासंदर्भात ट्वीट केलं आहे. लसीला शास्त्रज्ञांच्या संसोधनाच्या डेटाच्या आधारावर पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय मंजुरी मिळाली आहे. यामुळे ही लस करोनाच्या सर्व व्हेरियंटविरोधात प्रभावी असल्याचं सिद्ध होतंय. यामुळे आपली विश्वासार्हत आणखी वाढवली आहे, असं त्यांनी सांगिलं.
मेडिकल जरनलमध्ये प्रकाशित एक शोधही त्यांनी ट्वीट केला आहे. पण त्यांच्या ट्वीटनंतर कोवॅक्सिनच्या उपलब्धतेवरून पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित केले जात आहेत. कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन या लसींना केंद्र सरकारने आपत्कालीन वापरासाठी मंजुरी दिली होती.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times