औरंगाबाद: हिंदुत्वाची जाहीर भूमिका घेतल्यानंतर अध्यक्ष यांनी आपल्या मराठवाडा दौऱ्यात औरंगाबादच्या नामांतरावरून भूमिका स्पष्ट केली. ‘औरंगाबादचं नामांतर झालं तर काय हरकत आहे,’ असं ते म्हणाले. त्यांच्या या भूमिकेमुळं नामांतराचा मुद्दा पुन्हा तापण्याची चिन्हं आहेत.

वाचा:

राज्यातील राजकीय परिस्थिती बदलल्यानंतर राज ठाकरे यांच्या मनसेनं हिंदुत्वाच्या मुद्द्याकडं मोर्चा वळवला आहे. मागील महिन्यात झालेल्या पक्षाच्या राज्यव्यापी अधिवेशनात राज यांनी तसे स्पष्ट संकेत दिले. त्यानंतर त्यांनी बांगलादेशी घुसखोरांविरुद्ध मुंबईत मोर्चाही काढला. त्यातून त्यांची हिंदुत्वावादी अशी नवी ओळख पुढं येऊ लागली आहे. या पार्श्वभूमीवर त्यांच्या सध्याच्या मराठवाडा दौऱ्याकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे.

वाचा:

औरंगाबादच्या राजकारणात हिंदुत्वाचा मुद्दा नेहमीच कळीचा ठरला आहे. विशेषत: औरंगाबादचं नामांतर हा मुद्दाही केंद्रस्थानी असतो. त्याच अनुषंगानं राज ठाकरे यांनी पत्रकारांशी अनौपचारिक संवाद साधताना नामांतरावर भाष्य केलं. ‘औरंगाबदचं नामांतर करण्यास काय हरकत आहे? चांगले बदल झालेच पाहिजेत,’ असं ते म्हणाले.

औरंगाबादचं नामांतर ” असं करण्याची शिवसेनेची मागणी जुनीच आहे. शिवसेनेत पक्ष पातळीवर औरंगाबादचा उल्लेख ‘संभाजीनगर’ असाच केला जातो. मनसेनं हिंदुत्वाकडं वाटचाल सुरू केल्यानंतर तेथील कार्यकर्तेही औरंगाबादला ‘संभाजीनगर’ म्हणू लागले आहेत. पक्षाच्या पोस्टर, बॅनरवरही हेच नाव झळकू लागलं आहे. त्यामुळं येत्या काळात मनसे या मुद्द्यावरून आक्रमक भूमिका घेण्याची चिन्हं आहेत.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here