नागपूर : भारत बायोटेक ()कंपनीच्या जागेवरून आता भाजप आणि मविआ सरकारमध्ये नवं राजकारण पेटण्याची चिन्ह आहेत. कारण, भारत बायोटेक ही कोव्हॅक्सिन ( )लस निर्मितीसाठी नागपूरच्या मिहानमध्ये प्रकल्प सुरू करणार होती. पण, उपमुख्यमंत्री अजित पवार () यांनी आपलं राजकीय वजन दाखवून हा प्रकल्प पुण्याला पळवला, असा थेट आरोप भाजपचे आमदार कृष्णा खोपडे ( Krishna Khopade) यांनी केला आहे. ते नागपूरमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
लसीकरणाचा हा प्रकल्प नागपूरच्या मिहानमध्ये सुरू करणार अशी चर्चा होती. पण अजित पवारांनी आपल्या राजकीय ओळखीचा वापर करत हा प्रकल्प पुण्याला पळवला. इतकंच नाहीतर यासाठी नागपूरच्या पालकमंत्र्यांनी आवाज उठवला नाही, ते गप्प का राहिले असा सवाल कृष्णा खोपडे यांनी केला आहे.

खरंतर, मांजरी इथे वन विभागाची जमीन असून या जागेवर प्रकल्प सुरू करण्याबाबतचा प्रस्ताव भारत बायोटेक या कंपनीने राज्य सरकारकडे दिला होता. मात्र, त्यास प्रतिसाद न मिळाल्याने उच्च न्यायालयात दाद मागण्यात आली होती. न्यायालयाने सद्यस्थितीत करोना प्रतिबंधक लशींची आवश्यकता असल्याने या कंपनीला ही जागा देण्याचे आदेश दिले. त्यानुसार जागेची हस्तांतरण प्रक्रिया सुरू करण्यात आली असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली.

राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी जिल्हाधिकारी देशमुख यांना या जागेची पाहणी करण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार देशमुख यांनी या ठिकाणी जाऊन जागेची पाहणी केली. सद्यस्थितीत करोना प्रतिबंधक लशींची आवश्यकता आहे. त्यामुळे ‘भारत बायोटेक’ कंपनीला या जागेवर तातडीने प्रकल्प सुरू करण्यासाठी जागेबाबतचा करार आणि हस्तांतरणाची प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश देशमुख यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.

दरम्यान, आता एकीकडे करोनाचा धोका वाढत चालला असताना दुसरीकडे अशा प्रकारे पक्षीय राजकारणाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे यामध्ये सर्वसामान्य भरडले जात आहे. त्यामुळे निदान या महामारीमध्ये तरी राजकारण सोडून काम केलं पाहिजे अशी सर्वसामान्य जनतेची अपेक्षा आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here