कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये सत्ताधारी तृणमूल काँग्रेसला पुन्हा एकदा ” प्रकरणानं घेरलंय. या प्रकरणाची चौकशी पुन्हा एकदा सुरु करण्यात आलीय. या घोटाळ्याचे आरोपी आणि कॅबिनेट मंत्री आणि , तृणमूलचे आमदार मदन मित्रा आणि माजी भाजप नेते सोवन चॅटर्जी यांच्या घरावर सीबीआयनं छापे टाकलेत. त्यानंतर या चौघांनाही निजाम पॅलेस स्थित सीबीआय कार्यालयात आणण्यात आलं.

सीबीआयनं चौकशीनंतर चारही आरोपींना अटक केलीय. आता या चारही नेत्यांना न्यायालयासमोर हजर केलं जाणार आहे. सीबीआयची एक टीम कोर्टात दाखल झाल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी दिलीय.

‘…तर मलाही अटक करा’

याच दरम्यान मुख्यमंत्री यादेखील आपल्या वकिलासहीत सीबीआय कार्यालयात दाखल झाल्या आहेत. तृणमूल काँग्रेसच्या मंत्री आणि आमदारांच्या अटकेचा विरोध करताना त्यांनी केंद्रावर टीका केलीय.

राज्य सरकार किंवा न्यायालयाच्या नोटिशीशिवाय या चारही नेत्यांची अटक केली जाऊ शकत नाही. या नेत्यांना अटक केली तर मलाही अटक करा, असं आव्हानच मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सीबीआय अधिकाऱ्यांना दिलंय.

‘अटकेसाठी सभापतींची परवानगी आवश्यक’

अशा पद्धतीने मंत्र्यांची आणि आमदारांची अटक असंवैधानिक आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, कोणत्याही आमदाराला अटक करण्यापूर्वी सभापतींची परवानगी घेणं आवश्यक आहे. परंतु, माझ्याकडून अशा प्रकारची कोणतीही परवानगी घेण्यात आलेली नाही, असं सभापती बिमान बॅनर्जी यांनी म्हटलंय.

याच दरम्यान तृणमूल खासदार आणि वकील कल्याण बॅनर्जी हेदेखील सीबीआय कार्यालयात पोहचलेत. कायदेशीररित्या या प्रसंगाला आम्ही सामोरं जाऊ, असं त्यांनी म्हटलंय.

राज्यपालांनी दिली होती परवानगी

सीबीआयनं पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीप धनखड यांच्याकडून नारदा स्टिंग प्रकरणात फिरहाद हकीम, सुव्रत मुखर्जी, मदन मित्रा आणि सोवन चॅटर्जी यांच्याविरुद्ध खटला चालवण्याची परवानगी घेतली होती. उल्लेखनीय म्हणजे, पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२१ च्या निकालानंतर लगेचच राज्यपालांनी सीबीआयला खटला दाखल करण्याची परवानगी दिली होती.

नारदा घोटाळा

पश्चिम बंगालमध्ये २०१६ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी नारदा स्टिंग टेप जाहीर करण्यात आले होते. हे टेप २०१४ साली रेकॉर्ड करण्यात आल्याचा दावा करण्यात आला होता. कथित रुपात यात तृणमूलचे मंत्री, खासदार आणि आमदार एका काल्पनिक कंपनीच्या प्रतिनिधींकडून पैसे घेत असताना दिसत असल्याचा आरोप करण्यात आला होता. नारदा स्टिंग प्रकरण समोर आलं तेव्हा आरोपी मंत्रीपदावर होते.

हे स्टिंग ऑपरेशन कथितरित्या नारदा न्यूज वेबसाईटच्या मॅथ्यु सॅम्युअल यांच्याकडू करण्यात आल्याचं सांगण्यात येतं. कोलकाता उच्च न्यायालयानं मार्च २०१७ मध्ये स्टिंग ऑपरेशनच्या सीबीआय चौकशीचे आदेश दिले होते.

सोवन चॅटर्जी ना तळ्यात ना मळ्यात

भाजपामध्ये सहभागी होण्यासाठी तृणमूलला रामराम ठोकणाऱ्या सोवन चॅटर्जी यांनी सध्या दोन्ही पक्षांशी आपले संबंध तोडलेत.

भाजप नेते आणि सुवेंदू अधिकारींचंही घोटाळ्यात नाव

उल्लेखनीय यामध्ये तृणमूल नेत्यांसहीत त्या नेत्यांच्या नावाचाही समावेश आहे जे सध्या भाजपमध्ये दाखल झालेले आहेत. मात्र, आता चौकशी करण्यात आलेल्या आरोपींमध्ये या नेत्यांच्या नावाचा समावेश नाही.

भाजपमध्ये सहभागी झालेल्या आणि नंदीग्राम मतदारसंघात मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना पराभूत करणाऱ्या आणि मुकूल रॉय यांचंही नाव या घोटाळ्यात समोर आलं होतं. भाजपनं २०१६ साली आपल्या यूट्यूब चॅनलवर यासंबंधी अपलोड केलेला व्हिडिओ हे दोन्ही नेते तृणमूलमधून भाजपमध्ये दाखल झाल्यानंतर मात्र डीलिट केल्याची जोरदार चर्चा झाली होती.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here