मुंबई: राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक विकास मंत्री यांनी पुन्हा एकदा केंद्रातील मोदी सरकारवर करोना प्रतिबंधक लशीच्या मुद्द्यावरून टीकास्त्र सोडले आहे. निशाणा साधला आहे. देशातील नागरिकांच्या हक्काची लस जर परदेशात पाठवली तर लोक प्रश्न विचारणारच, असे सांगतानाच भाजपचे सरकार किती लोकांना अटक करणार आहे? असा सवालही मलिक यांनी विचारला आहे. लोकांचा आवाज दाबण्याची केंद्र सरकारची ही कायरता आहे, अशा शब्दात मलिक यांनी भाजपवर टीकास्त्र सोडले आहे. संपूर्ण देश एकजूट असून किती लोकांना तुम्ही अटक करता ते पाहू या, असेही मलिक यांनी म्हटले आहे. (how many people will arrest ask ncp leader and minister )

नवाब मलिक प्रसारमाध्यमांशी बोलत होते. केंद्र सरकार आणि भाजपवर टीका करताना मलिक म्हणाले की, ‘आम्ही लसगुरू आहोत असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दाओसमध्ये म्हटले होते. जेवढे भारतात झाले नाही त्यापेक्षा जास्त लस विदेशात पाठवण्यात आली आहे, असे यूएनमधील भारतीय दूतावासाने सांगितले. मात्र आता केंद्र सरकार एक कोटी लशी परदेशात पाठविल्या असल्याचे सांगत आहे. तर पाच कोटी लशींचे डोस परदेशात पाठवणे अनिवार्य असल्याने ते पाठवल्याचे काहीजण बोलत आहेत. आता देशात लस उपलब्ध होत नाही आणि म्हणून तर लोकांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत.’

क्लिक करा आणि वाचा-

यावेळी मोदी सरकारला एकावर एक प्रश्न विचारताना मलिक यांनी सरकारसह भाजपला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. ‘मोदीजी, आमच्या मुलांच्या हक्काती लस विदेशात का पाठवली?’, असा मजकूर असलेली पोस्टर्स देशातील नागरिक लावत असल्याचे लक्षात आणून देत मलिक यांनी भाजप आणि केंद्र सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. एकीकडे लोक असे प्रश्न विचारत असताना भाजपचे लोक मात्र लहान मुलांसाठी लसच तयार झाली नसल्याचे सांगत आहेत, असे मलिक म्हणाले.

क्लिक करा आणि वाचा-
सारीच भारतीय ही भारतमातेची लेकरे आहेत. मग जर लस विदेशात पाठवली तर लोक प्रश्न विचारणारच ना?, असा सवालही त्यांनी केला. मात्र, प्रश्न विचारणाऱ्या लोकांना केंद्र सरकार अटक करण्याचे काम करत आहे. आज संपूर्ण देशच प्रश्न विचारत आहे. पण मोदी, तुम्ही किती लोकांना अटक करणार असा प्रश्न त्यांनी शेवटी विचारला आहे.

क्लिक करा आणि वाचा-

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here